RBI Plastic Currency Notes: मोठी बातमी! RBI आणणार प्लास्टिकच्या नोटा; आता रुपया बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

RBI Plastic Currency Notes: भारतात लवकरच प्लास्टिकच्या (पॉलीमर) नोटा चलनात येण्याची शक्यता असून, RBI ने त्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
RBI Plastic Currency Notes
RBI Plastic Currency NotesPudhari
Published on
Updated on

RBI Plastic Currency Notes: भारतात लवकरच कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या (पॉलीमर) नोटा वापरात येण्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचे पाऊल उचलले असून, नोटा छापणारी RBIची कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने (BRBNMPL) पॉलीमर शीट खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी BRBNMPL ने जगभरातील कंपन्यांकडून 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' (EOI) मागवले आहेत. या प्रक्रियेनंतर प्लास्टिकच्या नोटांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

BRBNMPL म्हणजे काय?

BRBNMPL ही भारतीय रिझर्व्ह बँकेची नोटा छापणारी कंपनी आहे. देशातील चलनी नोटांची छपाई आणि त्यासंबंधित महत्त्वाची कामे ही कंपनी करते. पॉलीमर शीटसाठी EOI जारी केल्यामुळे प्लास्टिकच्या नोटांबाबतची तयारी आता पुढील टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.

RBI Plastic Currency Notes
Sonam Wangchuk Video: '20 जुलैपर्यंत मी जिवंत राहीन; त्यानंतर भूत बनून परत येईन'; सोनम वांगचुक यांचा नवा व्हिडिओ चर्चेत

प्लास्टिकच्या नोटांचे फायदे काय?

प्लास्टिकच्या नोटा सध्याच्या कागदी नोटांच्या तुलनेत अधिक टिकाऊ मानल्या जातात. त्यामुळे त्या जास्त काळ वापरता येतात. याशिवाय, अशा नोटा सहज फाटत नाहीत किंवा खराब होत नाहीत. त्यामुळे वारंवार नवीन नोटा छापण्याचा खर्च वाचणार आहे. पावसात किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास कागदी नोटा खराब होण्याची शक्यता असते. मात्र, पॉलीमर नोटांवर पाणी किंवा आर्द्रतेचा परिणाम तुलनेने कमी होतो.

RBI Plastic Currency Notes
Crocodile Attack Video: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले; पाच तासांनी सापडला मृतदेह

नोटांचे स्वरूप बदलणार?

RBI कडून अद्याप प्लास्टिकच्या नोटा चलनात कधी आणल्या जाणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, पॉलीमर शीट खरेदीसाठी जागतिक स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्यामुळे भविष्यात भारतीय चलनाचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.

डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असले तरी देशातील मोठा वर्ग आजही रोख व्यवहारावर अवलंबून आहे. त्यामुळे अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि दीर्घकाळ वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news