RBI New Rules | डिजिटल पेमेंटचे नियम बदलले! आता 'डबल सिक्युरिटी' अनिवार्य, RBI ची मोठी घोषणा

RBI New Rules | सुरक्षिततेसाठी दुहेरी पडताळणी! आता UPI आणि कार्ड पेमेंट होणार अधिक सुरक्षित.
Important news for UPI users
Important news for UPI users
Published on
Updated on

RBI New Rules

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट ऑथेंटिकेशन (Verification) संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा (Draft) जारी केला आहे. हे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या डिजिटल व्यवहारांवर होणार आहे. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या नवीन नियमांमागे डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करणे, हा मुख्य उद्देश आहे.

या नियमांनुसार, आता प्रत्येक डिजिटल पेमेंटसाठी किमान दोन वेगवेगळ्या ऑथेंटिकेशन फॅक्टर (दुहेरी पडताळणी) द्वारे पडताळणी करणे आवश्यक असेल. याचा अर्थ, तुमच्या व्यवहारांची डबल चेकिंग होईल, ज्यामुळे फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.

Important news for UPI users
Cyber Attack Tata Motors Shares : सायबर अटॅकनंतर टाटा मोटर्सचे शेअर्स गडगडले; JLR ला जवळपास २ बिलियन युरोचा फटका?

ओटीपी (OTP) बंद होणार नाही

अनेक ग्राहकांना भीती होती की, आता एसएमएस-आधारित ओटीपी (OTP) बंद केला जाईल. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले आहे की, ओटीपी बंद करण्याची कोणतीही योजना नाही. तरीही, बँका आणि कंपन्यांना ही सूट असेल की ते ग्राहकांना ओटीपी व्यतिरिक्त इतर पर्याय (उदा. बायोमेट्रिक) देऊ शकतील.

सामान्य युजरवर होणारा परिणाम

हे नियम लागू झाल्यावर सामान्य युजरसाठी डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील. यूपीआय (UPI) पेमेंट, कार्ड पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंग पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित होईल. फसवणूक झाल्यास बँकांची जबाबदारी निश्चित होईल आणि ग्राहकांना पडताळणीसाठी अधिक सुरक्षित पर्याय मिळतील. रोजचे छोटे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुलभ राहतील, पण मोठ्या आणि धोकादायक व्यवहारांवर सुरक्षा वाढेल.

Important news for UPI users
UPI EMI Feature| डिजिटल पेमेंटमध्ये मोठी क्रांती! आता यूपीआयने पेमेंटवर मिळेल ईएमआयचा पर्याय

नवीन नियमांमधील प्रमुख बदल

  1. दुहेरी पडताळणी (Two-Factor Authentication): प्रत्येक डिजिटल पेमेंटसाठी कमीत कमी दोन वेगवेगळ्या पद्धतीने पडताळणी करणे बंधनकारक असेल.

  2. डायनॅमिक फॅक्टर अनिवार्य: कार्ड स्वाईप वगळता, इतर सर्व डिजिटल पेमेंटमध्ये किमान एक ऑथेंटिकेशन फॅक्टर डायनॅमिक (प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा आणि युनिक) असणे आवश्यक आहे. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल.

  3. व्यवहारानुसार तपासणी: नवीन फ्रेमवर्कनुसार, जर एखादा व्यवहार जास्त धोकादायक (High Risk) असेल (उदा. मोठी रक्कम किंवा असामान्य व्यवहार), तर बँक त्याची अतिरिक्त तपासणी करू शकते. यामुळे छोट्या पेमेंटमध्ये फार अडचण येणार नाही.

  4. टोकनायझेशनला प्रोत्साहन: नवीन नियमांमुळे टोकनायझेशन (Tokenization) सेवा आणि तंत्रज्ञानाला अधिक प्रोत्साहन मिळेल. याचा अर्थ तुमचा मूळ कार्ड नंबर किंवा खाते क्रमांक शेअर न होता, त्याऐवजी एक युनिक कोड (टोकन) तयार होईल, ज्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news