

छोट्या शेअरची मोठी कमाल
पाच वर्षात १८००० टक्के रिटर्न
असा आहे या शेअर्सच्या भाववाढीचा प्रवास
छोटा पॅकेट मोठा धमाका
Penny Stock success story: भारतीय शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी अवघ्या काही रूपयापासून सुरूवात केली अन् त्यांची व्हॅल्युएशन सध्या हजारो रूपयात आहे. अशा स्टॉक्सवर विश्वास ठेवून ज्यांनी यात चांगली गुंतवणूक केली त्यांचे चांगलेच उखळ पांढरे झाले आहे.
असाच एक छोटा शेअर म्हणजे जिंदाल फोटो लिमिटेड (Jindal Photo Ltd Share) या शेअरने १ लाख रूपये गुंतवणाऱ्या लोकांना फक्त पाच वर्षात करोडपती केलं आहे. जवळपास पाच वर्षात या शेअर्सचा भाव ८ रूपयांपासून १५०० रूपयांपर्यंत पोहचला आहे.
हा Jindal Photo Share गुंतवणूकदारांसाठी पैसे छापण्याचं मशीन ठरला आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे या शेअर्सनं ८ रूपयांपासून १५०० रूपयांपर्यंत घेतलेली उसळी! 3 एप्रिल २०२० रोजी या Jindal Photo Share ची प्राईस ही ८.१५ रूपये होती. मात्र आता जवळपास पाच वर्षांनंतर २०२५ च्या ११ डिसेंबरला याच्या एका शेअरची किंमत ही १५२०.२० टक्क्यांनी वाढली आहे.
या हा Jindal Photo Share चा ८ रूपयांपासूनचा १५०० रूपयांपर्यंतचा प्रवास जर आपण रिटर्नच्या भाषेत मोजायला गेलो ता पाच वर्षात या स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना जब्बल १८,५५२ टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. हा एक Multibagger Return देणारा स्टॉक ठरला आहे.
गुंतवणूकदारांना किती फायदा झाला याचे गणित मांडले तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये पाच वर्षापूर्वी १ लाख रूपये गुंतवले असतील अन् त्यानं हे शेअर्स अजून होल्ड करून ठेवले असतील तर त्याची गुंतवणूक वाढून १.८६ कोटी रूपये झालेली असेल. याचा अर्थ हा गुंतवणूकदार करोडपती झाला असेल.
गेल्या पाच वर्षात Jindal Photo Share ने घेतलेली उसळी पाहुयात....
३ एप्रिल २०२० मध्ये या एका शेअरची किंमत ही ८ रूपये होती.
१ जानेवारी २०२१ मध्ये त्याची किंमत २५ रूपये झाली.
३१ डिसेंबर २०२१ ला हा शेअर २५३ रूपयांवर पोहचला.
३० डिसेंबर २०२२ ला या शेअरची किंमत ही ३४८ रूपयांपर्यंत पोहचली.
२९ डिसेंबर २०२३ ला या शेअर्सनं ५९४ रूपयांचा आकडा टच केला
२७ डिसेंबर २०२४ ला याची किंमत ९२६ पर्यंत पोहचली.
२०२५ मध्ये या शेअरची किंमत १६०० रूपयांपर्यंत वाढली आहे.
Jindal Photo Limited याची मार्केट कॅपिटल ही फक्त १५६० कोटी रूपये आहे. याचा ५२ आठवड्यांचा हाय लेवल १६१६.६० रूपये असून ५२ आठवड्यातील लो लेवल ही ५३६ रूपये इतकी आहे. या कंपनीची स्थापना ही १९८६ ला करण्यात आली होती. जिंदल फोटो ही फोटोग्राफिक व्यवसायातील एक मोठं प्रस्त आहे. त्यांच्या कोडक आणि फूजीफिल्म ब्रँड चांगलेच प्रसिद्ध आहेत.
(टीप: शेअर बाजारातील कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुम्ही मार्केट एक्सपर्ट्सचा सल्ला जरूर घ्या)