PAN 2.0 योजना काय आहे? काय होणार बदल; जाणून घ्या सविस्तर

PAN 2.0 | मंत्रिमंडळात प्रस्तावास मान्यता
PAN 2.0 scheme
केंद्र सरकारने करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी पॅन २.० योजनेस मंजुरी दिली. File Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी १४३५ कोटींच्या पॅन २.० (PAN 2.0) योजनेस मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

कर रचनेत पारदर्शीपणा आणि करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी पॅन २.० योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पॅनकार्डचे डिजिटायजेशन होणार असून नवीन पॅनकार्ड क्यूआर कोडसह उपलब्ध होणार आहेत. अद्ययायवत पॅनकार्ड करदात्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पॅनधारकांसाठी युनिफाईड पोर्टलची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन पॅनकार्ड पेपरलेस आणि ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. करदात्यांच्या अडचणी दर करण्यासाठी पॅन-२ प्रकल्पाची मदत होणार आहे. उद्योगजगतामधून व्यवसायाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी सर्व पॅन-टॅनचे एकत्रिकरण करण्याची मागणी करण्यात येत होती.

PAN 2.0 प्रकल्प काय आहे

उद्योगजगतातील करदात्यांच्या नोंदणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त योजना असणार आहे. ही योजना फलदायी ठरणार आहे. संपूर्ण यंत्रणा डिजिटल असणार आहे. पॅन, टॅन १.० मधील मधील सुविधा नव्या योजनात एकत्रित मिळणार आहेत. करदात्यांना जलद सेवा मिळणार असून खर्चातही बचत होणार आहे.

PAN 2.0 scheme
Pimpri Crime news : बोगस पासपोर्ट, पॅन कार्ड बनवणार्‍या संघटित टोळ्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news