No Cost EMI Scheme: नो कॉस्ट EMI खरंच 'व्याजमुक्त' असतो? सणासुदीच्या काळात खरेदी करण्यापूर्वी हे नक्की वाचा

मोबाईल, फ्रीज, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर कंपन्या अनेकवेळा नो कॉस्ट इएमआयची ऑफर देतात.
No Cost EMI Scheme
No Cost EMI Schemepudhari
Published on: 
Updated on: 

No Cost EMI Scheme Hidden Charges: दसरा, दिवाळी हा सणासुदीचा काळ जवळ आला की ई कॉमर्स कंपन्या मेगा सेलची घोषणा करतात. यावेळी ते नो कॉस्ट ईएमआयची देखील सुविधा देतात. काही उत्पादनावर तर ८० टक्के सूट देऊन ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याचा आणि उत्पादन खरेदी करण्यास भाग पाडलं जातं.

अनेक कंपन्या आपल्या उत्पादनावर नो कॉस्ट इएमआय ही देखील सुविधा देतात. म्हणजे व्याजाविना हप्ते अशी ही स्कीम असते. मोबाईल, फ्रीज, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर कंपन्या अनेकवेळा नो कॉस्ट इएमआयची ऑफर देतात.

No Cost EMI Scheme
Home Loan EMI: घर घेण्याचे स्वप्न महागणार! रेपोदर वाढला; गृहकर्जाचा ईएमआय तब्बल ३ हजारांनी वाढण्याची शक्यता

नो कॉस्ट इएमआय पूर्णपणे मोफत असतो?

नो कॉस्ट इएमआय ऐकायला खूप भारी वाटतो. महागडं सामान खरेदी करताना तुमच्याकडे जर तेवढी कॅश नसेल तर तुम्ही ती वस्तू हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. मात्र नो कॉस्ट इएमआय ही स्कीम पूर्णपणे मोफत नसते. याची भरपाई ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या सूट मधून केली जाते. त्यामुळे शेवटी ग्राहकाच्या खिशातूनच हे पैसे काढून घेतले जातात.

जाणकारांच्या मते यात ग्राहकांना व्याज द्यावं लागत नाही मात्र प्रोसेसिंग फी, सर्व्हिस टॅक्स आणि टॅक्स तसेच कॅश डिसकाऊंट सोडण्यासारख्या अटी मान्य कराव्या लागतात. त्यामुळं उत्पादन महागात पडते. त्यामुळं नो कॉस्ट इएमआयवर वस्तू खरेदी करत असताना काही गोष्टी तपासून पहायला हव्यात.

No Cost EMI Scheme
Crop Loans : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या

नेमका गेम काय?

समजा एक लाख रूपयांची वस्तू खरेदी करणार आहात. कॅश पेमेंट केल्यावर तुम्हाला ६ हजार सूट मिळणार होती. मात्र जर तुम्ही नो कॉस्ट इएमआयचा पर्याय निवडता तर तुम्हाला ही कॅश पेमेंटची सूट मिळणार नाही. ही सूटच तुमचे व्याज होते. त्याचबरोबर प्रोसेसिंग फी, प्री क्लोजर चार्जेस आणि जीएसटी सारखे चार्जेस देखील तुम्हालाच भरावे लागतात. याचा अर्थ जी स्कीम बिना व्याज म्हटली जाते त्यात ग्राहकाच्या खिशातूनच त्याचा खर्च वसूल केला जातो.

No Cost EMI Scheme
Credit Card Late Payment Charges: क्रेडिट कार्ड वापरताय... ही बातमी तुमच्यासाठी! ४६ पैशाच्या नादात १२०० रूपयांचा लागला चुना

फक्त ईएमआय नाही तर ऐकूण खर्च पाहा

झिरो कॉस्ट इएमआय अर्थात नो कॉस्ट इएमआय घेतेवेळी आधी प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क, टॅक्स याची माहिती घ्या. कर्ज चुकवताना कोणता चार्ज लागणार नाही ना. काही वेळा व्याज दर हा वस्तूच्या मूळ किंमतीतच समाविष्ट केलेला असतो. त्यामुळे इएमआयवर मिळणाऱ्या वस्तूंची किंमत आणि कॅशमध्ये त्याच वस्तूची किंमत किती आहे याची तुलना करण्याची गरज आहे.

No Cost EMI Scheme
Kisan Credit Card Scheme: पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना; पशुपालकांना शून्य टक्के व्याजावर कर्ज

कर्जाच्या अटी काळजीपूर्वक वाचा

कर्ज घेताना आधी करार आणि लॉक इन कालावधी, आधीच लोन क्लिअर करण्याचा शुल्क, उशीर झाल्यास लागणारा दंड, इएमआय बाऊन्स झाल्यावर काय दंड आहे याची सर्व पडताळणी करा. नो कॉस्ट इएमआयच्या नादात कॅश खरेदीवर मिळणारा डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस, सणासुदीची खास ऑफर तर मिस होत नाहीये ना हे देखील पाहणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news