Mumbai SMBs: मुंबई बनतेय भारताचं AI-हब! उद्योगांची एआयकडे धाव; लिंक्‍डइनचे महत्त्वाचे संशोधन

Mumbai SMBs AI Adoption: मुंबईतील लघु आणि मध्यम उद्योग एआयचा अवलंब करत आहेत. तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय स्पर्धेत टिकणे कठीण होत असल्याचे एसएमबींचे मत आहे.
Mumbai SMBs AI Adoption
Mumbai SMBs AI AdoptionPudhari
Published on
Updated on

Mumbai SMBs Rapidly Adopting AI: मुंबईतील लघु आणि मध्यम उद्योग (SMBs) कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (AI) वळत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर ही केवळ निवड नसून अस्तित्व टिकवण्याची गरज बनली आहे. लिंक्डइनच्या नव्या अहवालानुसार शहरातील तब्बल 89% एसएमबी AI मध्ये गुंतवणूक करत आहेत किंवा पुढील काळात तसा विचार करत आहेत. यासोबतच 87% व्यावसायिकांना आगामी 12 महिन्यांत व्यवसाय वाढीची खात्री असून डिजिटल हेच भविष्य असल्याचे ते स्पष्टपणे सांगत आहेत.

AI न वापरल्यास स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका

अहवालानुसार मुंबईतील व्यवसायांना खालील गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटत आहेत:

  • ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवणे — 59%

  • स्पर्धेत टिकण्यासाठी AI-ऑटोमेशन — 57%

  • डिजिटल परिवर्तनाशिवाय अस्तित्व धोक्यात — 51%

लिंक्डइन इंडिया चे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाबिरामण म्हणाले “मुंबईतील एसएमबी अधिक धोरणात्मक पद्धतीने AIचा वापर करत आहेत. चांगले कौशल्य, योग्य ग्राहक आणि योग्य नेटवर्कच्या मदतीने ते डिजिटल अर्थव्यवस्थेत काम करत आहेत. लिंक्डइनही या प्रवासात त्यांना सक्षम करण्यासाठी मदत करत आहे.”

Mumbai SMBs AI Adoption
Vehicle Fitness Test: ट्रकपासून बाइकपर्यंत... फिटनेस टेस्ट फी 2,500 वरून थेट 25,000 रुपये; गडकरींचा धक्कादायक निर्णय

भरतीपासून मार्केटिंगपर्यंत AI बनलं ‘ऑपरेटिंग सिस्टम’

मुंबईतील व्यवसाय AI चा वापर खालील महत्त्वाच्या कामांमध्ये करतात:

  • वर्कफ्लो ऑटोमेशन — 88%

  • डेटा विश्लेषण व निर्णयक्षमता — 88%

  • कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवणे— 87%

भरतीच्या पद्धतीही बदलल्या आहेत. पदवीपेक्षा खालील कौशल्ये अधिक महत्त्वाची ठरत आहेत:

  • नेतृत्व व टीम मॅनेजमेंट — 58%

  • क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग — 55%

  • डिजिटल साक्षरता आणि AI कौशल्ये — 53%

तसेच, 53% एसएमबी भरतीसाठी AI टूल्स वापरत असून यामुळे अधिक गुणवत्तापूर्ण उमेदवार मिळत असल्याचे दिसते.

विक्री व मार्केटिंगमध्येही मोठा बदल

  • 69% एसएमबी AI मार्केटिंग टूल्स वापरत आहेत

  • त्यापैकी 94% कंपन्या जवळपास अर्ध बजेट AI मार्केटिंगसाठी वापरतात

  • विक्रीसाठी 66% AI टूल्सवर अवलंबून

स्केलरचे CMO राहुल कार्तिकेयन यांनी सांगितले “AI च्या मदतीने अचूक मार्केटिंग करता येते. रिटर्न ऑन स्पेंडही दुपटीने वाढताना दिसतो.”

Mumbai SMBs AI Adoption
Aadhaar Card Update: तुमचं आधार कार्ड पुन्हा बदलणार! आता नाव, पत्ता दिसणार नाही; फक्त...

मुंबईतील उद्योग आता नवे डिजिटल भविष्य घडवत आहेत. AI चा वापर करताना शहरात अधिक स्पर्धात्मक आणि सुरक्षित एसएमबी इकोसिस्टम निर्माण होत आहे. मुंबई फक्त आर्थिक राजधानी नाही तर भारताच्या AI क्रांतीचे नेतृत्व करणारे टेक-पॉवरहाऊस म्हणूनही काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news