

भक्ती साळोखे
भारतीय बाजार वर जाण्यासाठी ट्रीगर्सच्या शोधात आहे, असे मागील आठवड्यात लिहीले होते. त्याची प्रचीती देणारा हा सप्ताह होता. वर जाण्यास काही निमित्त नाही आणि खाली जाण्याची बाजाराची इच्छा नाही. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन मुख्य निर्देशांक अर्धा टक्का, घसरले तरी निफ्टी बँक, मिड कॅप निफ्टी आणि स्मॉल कॅप निफ्टी ह्यांनी बाजार सावरून धरला. मिड कॅप इंडेक्स फ्लॅट राहिला तर निफ्टी बँक अर्धा टक्का आणि स्मॉल कॅप इंडेक्स पाऊण टक्का तेजीत राहिले.
मीडिया, रिॲल्टी आणि मेटल्स शेअर्स चांगले तेजीत राहिले. मीडिया शेअर्सपैकी Zeel (Rs.107.58), Prime Focus (Rs. 296.95), Network 18 (Rs. 29.86) आणि PVR INOX (Rs.1216.80) हे शेअर्स तेजीत राहिले.
सन २०२७ मध्ये Premium आणि Luxury Housing Demand ९ ते ११ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. मेट्रो सिरीजमधील त्यांचे बुकींग्जचे आकडे हेच दर्शवित आहेत. त्यामुळे रिॲल्टी सेक्टर चांगलेच तेजीत आहे. Brigad Enterprises हा शेअर सप्ताहात सर्वाधिक म्हणजे साडेआठ टक्के वाढला.
(Rs. ६२५.७५) ह्या शेअरचा चार्ट पाहता हा शेअर नजिकच्या काळात मोठी तेजी दर्शवेल असे वाटते. Prestige Estates, Aditya Birla Real Estate, Anant Raj Ltd, DLF, Sobha हे शेअर्स देखील तेजीत राहिले.
Global Commodity Prices मधील तेजी, पुरवठ्यावरील ताण ह्यांमुळे Metal आणि Mining शेअर्सना मागणी होती. Hindustan Copper आणि Hindustan Zinc हे दोन्ही शेअर्स प्रत्येकी साडेपाच टक्के वाढले. परंतु, मेटल्समध्ये सर्वाधिक बहार आणली ती Welspun Corpह्या शेअरने हा शेअर सप्ताहात २४ टक्के वाढला. शेवटच्या दिवशी तर ताे १७ टक्के वाढला. एका महिन्यात तो ४० टक्के वाढला आहे तर मागील सहा महिन्यांत तो जवळपास २०० टक्के म्हणजे तिप्पट वाढलाआहे.
वेलस्पन कॉर्प ही कंपनी मोठ्या व्यासाच्या स्टील पाईप्स बनवते. शिवाय तिने बिल्डिंग मटेरिअल्सचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी वॉटर टँकस् बनविणारी Sintex - BAPL ही कंपनी अधिग्रहीत केली. कंपनीचा विक्री विस्तार सहाही खंडामधील ५० हून अधिक देशांमध्ये आहे. अतिशय उत्कृष्ट फंडामेंटल्स असणाऱ्या ह्या कंपनीची खालील आकडेवारी पाहा :
ROCE - 23%
ROE - 19%
3 years salesgrowth - 20%
3 years Profit growth - 119%
नुकताच कंपनीने एका अमेरिकन कंपनीशी रु. १७२०० कोटी रुपयांच्या पाईप्स विक्रीचा करार केला. आज रु. २३१२ ला मिळणारा हा शेअर अल्पावधितच रु. ३००० चा भाव दाखवेल, असे वाटते.
सप्ताहामध्ये सर्वाधिक वाढलेल्या शेअर्समध्ये खालील काही शेअर्सचा समावेश आहे.
1) Jyoti CNC - Rs. 988.80 - 19%
2) Welspun Living - Rs. 189.22 - 18%
3) Balarampur Chini - Rs. 729.35 - 18%
4) Aegis Logistics - Rs. 1417.90 - 14%
5) The Leela Palace Hotels
- Rs. 561.70 - 11%
सणासुदीचा हंगाम आता नागपंचमीपासून सुरू झाला आहे. ताे सुरू झाला की दरवर्षी बाजारात साखरेचे दर हा चर्चेचा विषय होतो आणि साखरेचे दर वाढू लागतात. ह्या वर्षी, सणासुदीच्या हंगामादरम्यानच साखरेचे दर वाढण्यास आणखी एक फॅक्टर कारणीभूत ठरला आहे आणि तो म्हणजे इथेनॉल! वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी शासनाकडून धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्याने इथून पुढे इथेनॉलसाठी वीस टक्के ऊस वळवला जाईल. त्यामुळे साखरेची जेवढी मागणी असते. तेवढा पुरवठा कमी होईल. ह्या दोन्ही कारणांमुळे साखरेचे दर वाढू लागले आहेत. परंतु, सरकारचे साखर दरांबाबतचे धोरण फारच लवचिक असल्याने हे दर किती काळ वाढलेले राहतील, ह्याची शंकाच आहे. वर बलरामपूर चिनी ह्या शेअरमधील वाढीचा उल्लेख केला. इतरही प्रमुख शुगर शेअर्समधील सप्ताहातील वाढ पाहा :
1) Triveni Engineering - Rs. 293.52 - 5%
2) Bajaj Hindustan - Rs. 23.08 - 32%
3) Renuka Sugar - Rs. 25.22 - 13%
4) Bannari Amman - Rs. 4050 - 17%
5) Dalmia Bharat - Rs. 499.30 - 14%
6) Avadh Sugar - Rs. 850 - 22 %
7) Uttam Sugar - Rs. 324.98 - 18%
8) Dhampur Sugar - Rs. 186 - 12 %
9) Dwarikesh Sugar - Rs. 53.75 - 22 %
10) Ugar Sugar Works - Rs. 56.55 - 8%
जेंव्हा जेंव्हा अमेरिकेत ट्रेझरी बाँड यील्डस् वाढतात, तेंव्हा तेंव्हा भारतीय बाजारावर ताण येतो ही परिस्थिती आपण बऱ्याच वेळा अनुभवतो. असे का हाेते? कारण यू. एस. ट्रेझरी बाँडस् हे जगभरातील संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी Safe Heaven समजले जाते. त्यामुळे FII, FPI भारतासारख्या Emerging Markets मधून पैसा काढून घेतात आणि तो यूएस ट्रेझरी बाँडस्मध्ये गुंतवतात. FIIs कडून भारतीय बाजारात विक्री वाढते आणि त्यामुळे भारतीय बाजार कोसळतो. शिवाय ह्याचा आणखी एक परिणाम असा होतो की, FIIs कडून शेअर्सची विक्री झाल्यामुळे आणि तो पैसा यूएसमध्ये गुंतवला जात असल्यामुळे डॉलरला मागणी वाढते आणि रुपया कमजोर होतो. तेव्हा बाजारामध्ये Emerging market risk विरूद्ध U.S. Treasury Safety हा संघर्ष वरचेवर उद्भवतो. परंतु, जरी यामुळे Sale off येऊन भारतीय बाजार घसरला तरी भारतीय कंपन्यांच्या फंडामेंटल्सवर त्याचा काही परिणाम होत नाही. उलट अशा वेळी दीर्घकाळच्या गुंतवणूकदारांना खरेदीची संधी प्राप्त होते.
बाजारात कित्येक दिवस 'जैसे थे' स्थिती असली आणि लार्जकॅप निर्देशांक आणि लार्जकॅप शेअर्स कुंठितावस्थेत असले तरी स्मॉल कॅप आणि मायक्रो
कॅप स्टॉकस्चा जलवा, कायम आहे. Nifty Small Cap 250 हा निर्देशांक 52 Week Highचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. आता Nifty Microcap 250 ह्या इंडेक्सनेही ५२ Week High चा उच्चांक गाठला आहे.
ह्या इंडेक्सने नेहमीच निफ्टीला मागे टाकले आहे. मागील सहा महिन्यांचा डेटा पाहिला तर Nifty ५० ने उणे साडेपाच टक्के परतावा दिला आहे तर Nifty Microcap २५० ने अधिक साडेएकवीस टक्के असा छप्पर फाडके परतावा दिला आहे.
खालील मायक्रो कॅप शेअर्सनी मागील सप्ताहात ५२ Week High चा उच्चांक गाठला.
1) Avalon Technologies - Rs. 2269.40
2) Karnataka Bank - Rs. 324.85
3) Credent Connect N Care - Rs. 377.05