बाजाराची उच्चांकाकडे सुखद वाटचाल

बाजाराची उच्चांकाकडे सुखद वाटचाल

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये जेव्हा स्थैर्य येते तेव्हा काय होते? गत सप्ताहाने तेव्हा काय होते हे दाखवून दिले. निफ्टी (19201.70), सेन्सेक्स (64768.58) आणि निफ्टी बँक (44787.10) या प्रमुख निर्देशांकांनी (All time high) ची पातळी गाठली.

सर्वच आघाड्यावर भारताची होत असलेली सुधारणा, आंतरराष्ट्रीय पतनामांकन संस्थांकडून भारताच्या मानांकनात होत असलेली वाढ, परकीय गुंतवणूकदार संस्थांकडून भारतीय बाजारात होत असलेली भरघोस खरेदी यामुळे बाजार उंच उंच जात आहे. गेल्या आठवड्यात FII नी 20362 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली.

सहस्त्र की आकडे म्हणजे उदा. 17000, 18000, 19000 हे एकाच वेळी Psycological Targets ही असतात आणि Psycological Barriers ही असतात. त्यामुळे या सप्ताहात निफ्टीने 19000 चा टप्पा पार करणे, ही तेजीच्या द़ृष्टीने अतिशय मोलाची घटना आहे. आता निफ्टीची 20000 कडे सेन्सेक्सची 70000 कडे आणि निफ्टी बँकेची 50000 कडे वाटचाल सुरू होईल. विदेशी आणि दोशी गुंतवणूक संस्थांकडून इथून पुढे खरेदीचा ओघ वाढेल. म्युच्युअल संस्थांकडून अगोदरच लोकांची गुंतवणूक वाढत आहे. त्यामध्ये अजून वाढ होईल. जवळपास 45 लाख कोटी रु. च्या आसपास आज असलेला म्युच्युअल फंड व्यवसाय सन 2030 च्या सुमारास 100 लाख कोटी रुपयांवर जाईल, असे जाणकारांचे मत आहे. तेव्हा निफ्टी, सेन्सेक्स आणि निफ्टी बँक कोणत्या शिखरावर असतील?

FOMO Rally अशाच वातावरणात सुरू होते. तुम्हाला माहिती आहे का FOMO Rally म्हणजे काय? FOMO म्हणजे Fear of missing out! शुद्ध मराठीत सांगायचे तर वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे. बाजारात रोज नवीन नवीन उच्चांक प्रस्थापित होत जातात आणि एरव्ही बाजाराशी चार हात दूर असणारे बाजारात गुंतवणूक करू लागतात. त्यांना वाटते, बाजार जोमात आहे. कदाचित पैसे कमविण्याची संधी आपल्या हातून निसटून जाईल. Fear of missing out!

हे रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे सामान्य गुंतवणूकदार हे एक अजब रसायन आहे. या वर्गाची अर्थसाक्षरता वाढावी, त्यांना डोळसपणे गुंतवणूक करावी यासाठी सेबी, अ‍ॅम्फी या बाजार नियामक संस्थांनी प्रचंड प्रमाणावर कार्य सुरू केले आहे. यशस्वी संस्थांनी प्रचंड प्रमाणावर कार्य सुरू केले आहे. यशस्वी गुंतवणुकीचे मूलभूत तत्त्वे जे बाजार खाली असेल तेव्हा खरेदी करा आणि वर असेल तेव्हा विक्री करा, हे तत्त्व सामान्य गुंतवणूकदारांनी सदैव ध्यानात ठेवावे, अनुभव नेहमीच विपरीत येतो.

HDFC आणि HDFC Bank Merger असा मूर्त स्वरूप होईल. HDFC च्या शेअरधारकांना प्रत्येक 25 शेअर्सच्या बदल्यात बँकेचे 42 शेअर्स मिळतील. ज्यांच्याकडे 25 पेक्षा कमी शेअर्स असतील त्यांना बाजारभावाप्रमाणे रोख पैसे मिळतील. त्या मर्जरमुळे एचडीएफसी बँक मार्केट कॅपनुसार जगातील चौथ्या क्रमांकाची बँक बनेल. 172 बिलियन डॉलर्स (1 बिलियन म्हणजे 100 कोटी आणि 1 डॉलर म्हणजे 82 रुपये) एवढे तिचे Msrket Captalisation होईल. Msrket Cap हे Msrket Captalisation चे लघुरूप आहे. म्हणजे बाजार भांडवल कंपनीचे जेवढे शेअर्स बाजारात आहेत. त्याला एका शेअरच्या बाजारभावाने गुणले की Msrket Cap चे आकडे कळते.

गतसप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या शेअर्समधील तेजी! ICICI Securities 18.11 टक्के, HDFC AMC 12.06 टक्के छरा खपवळर 13.07 टक्के, तर UTI AMC 14.44 टक्के वाढला. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडस्, इन्शुरन्स यामधील सामान आणि विशेषत: ग्रामीण जनतेचा सहभाग जसजसा वाढत जाईल तसतसे हे शेअर्स आणखी वधारतील.

वरील पैकी Nam India म्हणजे Nippon Asset Management कंपनी ही जपानच्या Insurance प्रवर्तीत केलेली कंपनी आहे. शुक्रवारचा तिचा बंद भाव आहे. रु. 288.15! वर्षभरातील उच्चांक आहे रु. 326.10 हा शेअर्स 500 रु. चा भाव मध्यम कालावधीत नक्की दाखवेल.

भरत साळोखे,
संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news