जाणून घ्या आयटीआरची व्हेरिफिकेशन प्रक्रिया…

जाणून घ्या आयटीआरची व्हेरिफिकेशन प्रक्रिया…
Published on
Updated on

एखाद्या आयटीआरचे व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आयटीआर भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. व्यक्तिगत करदात्यांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 यासाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. उशिरा किंवा दुरुस्तीसह आयटीआर विवरण 31 जानेवारी 2022 पर्यंत दाखल करता येणे शक्य आहे. परंतु लक्षात ठेवा की, केवळ आयटीआर भरणे पुरेसे नाही. कारण आयटीआर भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत आयटीआरची प्रक्रिया पूर्ण होत नाही.

एखादा करदाता वेळेवर आयटीआर भरत असेल; परंतु तो आयटीआरला व्हेरिफाय करण्यास विसरत असेल, तर आयटीआरची प्रोसेस पूर्ण झाल्याचे गृहीत धरता येणार नाही. सिस्टीमच्या नजरेतून आयटीआर पूर्ण न भरणे हे नोटीस बजावण्यास पात्र राहू शकते. प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, कोणताही व्यक्ती सहा मार्गाने आपल्या आयटीआरचे व्हेरिफिकेशन करू शकतो.

नेटबँकिंग : नेटबँकिंगच्या माध्यमातून ईव्हीसी जनरेट करून आयटीआर फाईल करण्याचा पर्याय निवडता येतो. या कृतीनंतर आपली बँक निवडून त्याच्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करून टॅक्स स्लॅबवर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर रिडायरेक्ट होऊ शकाल. त्या ठिकाणी 'चू अलर्लेीपीं' टॅबमध्ये जनरेट इव्हीसीचा पर्याय निवडा. त्यानंतर मोबाईल आणि ई-मेलवर दहा अंकी अल्फा न्यूमेरिक कोड येईल. तो 72 तासांपर्यंत व्हॅलिड असतो. प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर 'चू अलर्लेीपीं' टॅबमध्ये इ व्हेरिफायच्या पर्यायावर जाणे आणि 'ख हर्रींश एतउ रश्रीशरवू' च्या पर्यायाची निवड करून मोबाईल नंबरच्या मदतीने आपले आयटीआरला व्हेरिफाय करा.

'आधार' ओटीपी : ऑनलाईन प्राप्तिकर विवरण व्हेरिफाय करण्यासाठी इन्कमटॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर जाणे आणि डाव्या बाजूला 'इम्पॉरटंट लिंक्समध्ये ई-फाईल रिटर्नवर क्लिक करा.

आता नवीन पान समोर येईल आणि अवर सर्व्हिसेसमध्ये ई-व्हेरिफायवर क्लिक करा.

रिटर्नचे डिटेल जसे की पॅन, असेसमेंट इअर, मोबाईल नंबर, अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर टाकून पुढे जावे लागेल. पुढे व्हेरिफिकेशन सेगमेंट आणि नंतर व्हेरिफिकेशन मेथड सेगमेंट येईल.

व्हेरिफिकेशन मेथडमध्ये आपण आधार ओटीपीच्या मदतीने रिटर्न व्हेरिफायचा पर्याय निवड शकता. या पर्यायात आपल्या आधारमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

ओटीपी दिल्यानंतर सबमिटवर क्लिक करा

* आपल्याला 'रिटर्न ई व्हेरिफाय' झाल्याचा मेसेज येईल.
* बँक खाते : बँक खात्याच्या माध्यमातून रिटर्न ई व्हेरिफाय करण्यासाठी आपले बँक खाते क्रमांक प्री व्हॅलिडेट असणे गरजेचे आहे. बँक खात्याचा नंबर व्हॅलिडेट करण्यासाठी खाते पॅनला लिंक करावे लागेल.
* व्हॅलिडेशननंतर ई फायलिंग पोर्टलवर जाऊन ई व्हेरिफायवर क्लिक करा.
* रिटर्न व्हेरिफायचा पर्याय निवडा आणि आपल्या खात्याचे डिटेल्स सबमीट करून ओटीपी जनरेट करा.
* आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक इव्हीसी पाठवण्यात येईल.
* या 'ईव्हीसी'ला सबमिट केल्यानंतर आपले रिटर्न 'व्हेरिफाय' होईल.

डिमॅट खाते : आपण डिमॅट खात्याचा वापर करत असाल तर त्या माध्यमातून देखील आयटीआर व्हेरिफाय करता येऊ शकतो. डिमॅटची पद्धत बँक खात्याप्रमाणेच आहे. सुरुवातीला आपल्याला डिमॅट अकाऊंटला प्रीव्हॅलिडेट करावे लागेल. डिमॅट खाते प्रीव्हॅलिडेट झाल्यानंतर ईव्हीसी जनरेट करा आणि नंतर मोबाईल नंबरच्या मदतीने आयटीआरला व्हेरिफाय करा. ही प्रक्रिया संपूर्णपणे बँक खात्याप्रमाणेच आहे.

एटीएम :

श्रएटीएम कार्डला बँकेच्या एटीएममध्ये स्वाईप करा
पीन फॉर इन्कमटॅक्स फायलिंगवर क्लिक करा.
नोंदणीकृत मोबाईल नंबर इव्हीएस पाठवला जाईल.
आता प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करा आणि ई व्हेरिफायच्या रिटर्न ऑप्शनवर क्लिक करा.
श्रव्हेरिफाय मेथडमध्ये 'अ‍ॅलरेडी जनरेटेड इव्हीसी थ्रो बँक एटीएम'च्या पर्यायावर क्लिक करा.
श्रमोबाईलवर पाठवलेला इव्हीसी कोड टाका आणि आपले आयटीआर व्हेरिफाय होईल.
अर्थात केवळ सात बँकांच्या मदतीनेच या सुविधेचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. त्यात अ‍ॅक्सिस बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय, कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआय यांचा समावेश आहे.

ऑफलाईन : ई व्हेरिफिकेशनसाठी वरील पाचपैकी कोणतेही पर्याय आपल्याला उपयुक्त ठरत नसतील किंवा आपल्याचा त्याचा वापर करायचा नसेल, तर आपण आयटीआर-5 फॉर्मवर सही केलेली कॉपी प्राप्तिकर विभागाला पाठवून रिटर्न व्हेरिफाय करू शकत. आयटीआर-व्ही फॉर्मवर निळ्या शाईच्या पेनने स्वाक्षरी करा आणि सीपीसी पोस्ट बॉक्स-1, इलेक्ट्रॉनिक सिटी पोस्ट ऑफिस, बंगळूर-560100, कर्नाटक, भारत यावर स्पीड पोस्टने पाठवावे.

ही कॉपी प्राप्तिकर विभागाला मिळाल्यानंतर आपल्या मोबाईलवर आणि मेलवर त्याचे नोटिफिकेशन येईल. लक्षात ठेवा, आयटीआर-5 हे ई फायलिंगच्या तारखेपासून 120 दिवसांच्या आत सीपीसी बंगळूरला पोहोचणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news