अर्थभान : क्रेडिट कार्डचा शुल्कमहिमा    

Published on
Updated on

नोटाबंदीनंतर आता सर्वच जण आपले व्यवहार डिजिटल माध्यमातून करण्याचा विचार करत आहेत. क्रेडिट कार्ड हा चांगला पर्याय अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. हा पर्याय ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवहाराचा लोकप्रिय मानला जातो. परंतु क्रेडिट कार्ड मोफत नाही, हे अगोदर लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण अनेक बँकांनी पॉइंट ऑफ सेलवर शुल्क कपात केली असली तरी अन्य अनेक शुल्क आकारले जातात. आकारण्यात येणारे शुल्क किंवा चार्ज आणि क्रेडिट कार्ड ट्रान्झेक्शनचा परिणाम हा क्रेडिट स्कोरवर होतो. जर आपण कॅशलेस ट्रान्झेक्शनकडे वाटचाल करत असाल तर क्रेडिट कार्डचा वापर करताना सजग राहणे तितकेच गरजेचे आहे.

फ्री क्रेडिटसारखे दुसरे काही नाही :  मेटेंनन्स फिसचा विचार केला तर क्रेडिट कार्ड जीवनभर फ्री उपलब्ध राहू शकते. त्यासाठी कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जात नाही. अशा प्रकारचे कार्ड हे वरवर मोफत वाटतात. परंतु या कार्डचे शुल्क अन्य कार्डपेक्षा अधिक असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या कार्डासाठी वार्षिक शुल्क आकारण्यात येते त्यापेक्षा निशु:ल्क कार्डाचे कर अधिक असतात. त्यामुळे साधारणत: एका क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क सरासरी तीनशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत असते. प्रत्येक कार्डासाठी शुल्क वेगळे असते.  

वार्षिक व्याजदर 24 ते 40 टक्के : बहुतांशी क्रेडिट कार्ड कंपन्या चाळीस ते 50 दिवसांचे व्याजमुक्‍त वेळ देते. त्यानंतर खर्च केलेल्या रकमेवर दोन ते साडेतीन टक्के व्याजआकारणी केली जाते. महिन्याचा हिशोब केला तर ते व्याज कमी वाटते. परंतु वार्षिक विचार केला तर हे व्याज 24 ते 40 टक्क्यांपर्यत पोचते. आपण कार्डचा वापर जसा वाढवतो, तशी क्रेडिट लिमीट कमी कमी होऊ लागते. जर आपण मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला तर कंपन्या दोन ते अडीच टक्के पेनल्टी आकारतात. 

मुदतपूर्वीच बिल भरा : प्रत्येक महिन्याला एक तारीख निश्‍चित केली जाते की, त्यादिवशी क्रेडिट कार्डचे बिल आपल्याला भरावेच लागते. बँक यासाठी आपल्याला दोन पर्याय देते. पहिला म्हणजे आपण पूर्ण पैसा भरणे किंवा जर आपण दिलेल्या वेळेत पैसे जमा केले नाही तर आपल्याला कार्डच्या अटीनुसार पेनल्टी जमा करावी लागते. बँक सामान्यपणे वीस हजारापर्यंत शंभर रुपये ते पाचशे रुपयांपर्यंत पेनल्टी लावते. वीस हजारांच्या वर व्यवहार झाले असतील त्यासाठी  800 रुपयांपर्यंत पेनल्टी बसते. 

ऑनलाईन अकाऊंट तयार करा : क्रेडिट कार्डच्या खात्याच्या अकाऊंटचे स्टेटमेंट वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. जर आपण स्टेटमेंटची डुप्लीकेट कॉपी जरी मागितली तर त्यावर शुल्क आकारले जाते. बँक त्यासाठी 50 ते 200 रुपयांपर्यंत शुल्क ग्राहकाकडून वसूल करते. यासाठी आपण क्रेडिट कार्डचे बँक खात्याप्रमाणेच ऑनलाईन खातेही सुरू करणे गरजेचे आहे. 

सिबिल स्कोअरवर परिणाम : क्रेडिट कार्डचा जास्त वापर हा आपल्या सिबिल स्कोअरवर परिणाम करणारा ठरू शकतो. या आधारावरच बँकेकडून आपल्याला कर्ज मिळत असते. बँक आपल्या कार्डच्या वापराची एक रक्‍कम निश्‍चित करत असते. जर आपण मर्यादेपेक्षा अधिक वापर करत असाल तर आपल्या सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण खर्चाची विभागणी वेगवेगळ्या कार्डात करावी. या पद्धतीने खर्च केल्यास आपले क्रेडिट यूटिलायजेशन रेशो कमी राहील. जर आपली मर्यादा एक लाख असेल तर महिन्याकाठी वीस हजारांहून अधिक खर्च करू नये. यातून आपला सीयूआर 20 टक्क्यांच्या आसपास राहील. हा क्रेडिट स्कोअर आपल्यासाठी चांगला राहील. 

अपर्णा देवकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news