UAN नंबर विसरलात?; EPFO च्या वेबसाइटवरून असा पुन्हा मिळवा

UAN नंबर विसरलात?; EPFO च्या वेबसाइटवरून असा पुन्हा मिळवा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा महत्त्वाचा क्रमांक बनला आहे. आता तुम्ही तुमचे पीएफ खाते UAN द्वारे ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला तुमचे शिल्लक पीएफ खाते (EPFO)  UAN द्वारे ऑपरेट करावे लागेल. किंवा तुम्ही इतर कोणत्याही सुविधेचा लाभ घेऊ शकता . तुम्ही तुमचा UAN नंबर विसरला असाल तर तुम्ही तो असा पुन्हा मिळवू शकता.

(EPFO) UAN हा १२ अंकी क्रमांक आहे. हा नंबर ईपीएफओकडून दिला जातो. तो संपूर्ण आयुष्यभर कायम राहतो. तुम्ही कितीही नोकऱ्या बदलल्या तरीही तो कायम राहतो. नवीन सदस्य जॉईन झाल्यानंतर EPFO कडून त्या नवीन सदस्याला नवीन EPFO ​​क्रमांक दिला जातो.

EPFO : आपण असे जाणून घेऊ शकता UAN क्रमांक :

-सर्वप्रथम तुम्ही EPFO ​​च्या https://epfindia.gov.in/site_en/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

-त्यानंतर सेवांवर क्लिक करावे लागेल.

-यानंतर, कर्मचाऱ्यांसाठी क्लिक करा,

-तुम्हाला सदस्य UAN/ऑनलाइन सेवांवर क्लिक करावे लागेल.

-आता तुम्हाला तुमच्या UAN पोर्टलवर जावे लागेल.

-तुमचा मोबाईल नंबर आणि पीएफ सदस्य आयडी द्यावा लागेल.

-आता तुम्हाला Get Authorization PIN वर क्लिक करावे लागेल.

-त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पिन क्रमांक पाठवला जाईल.

-आता OTP टाका, त्यानंतर Validate OTP वर क्लिक करा, त्यानंतर तुमचा UAN येईल.

हे काम UAN द्वारे केले जाऊ शकते. UAN द्वारे तुम्हाला ऑनलाइन PF ट्रान्सफर, बॅलन्स चेक आणि पैसे काढण्याची सुविधा मिळते, तुमची सर्व जुनी आणि नवीन खाती या UAN मध्ये दिसतात.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news