Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच सोन्याच्या दरानं अचानक बदलली चाल... चांदीही धडाम

Gold-Silver Rates Today
Gold-Silver Rates TodayPudhari
Published on
Updated on

Gold-Silver Rate Today: गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX च्या वायदा बाजाराची सुरूवात झाल्यावर सोने आणि चांदी दोन्हीच्या किंमती घसरल्या.

Gold-Silver Rates Today
Gold Silver Rate Today: सोने चांदीच्या दरात मोठी घसरण... चांदी ७००० ने तर सोनं इतक्या किंमतीनं झालं स्वस्त

सोने सुरूवातीच्या घसरणीनंतर रिकव्हरीच्या मोडमध्ये आला. मात्र त्यानंतर तो पुन्हा घसरायला सुरूवात झाली. चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्या किंमतीत वेगानं घट होत आहे. चांदीच्या १ किलोच्या दरात १४०० रूपयांची घसरण झाली आहे. वायदा बाजारात चांदी आपल्या हाय लेवलच्या अजून जास्त स्वस्त झाली आहे.

Gold-Silver Rates Today
Gold-Silver Rate Fall: 3 दिवसांत चांदी 11,000 रुपयांनी स्वस्त; बाजार उघडताच सोन्याचे भाव कोसळले, जाणून घ्या ताजे दर

सोन्याची बदलली चाल

एमसीएक्सच्या वायदे बाजाराची सुरूवात झाली त्यावेळी ४ सप्टेंबरच्या एक्सपायरी डेटची चांदी आणि ५ ऑगस्ट एक्सपायरीचे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर १० ग्रॅमला १ लाख ४७ हजार, ३७८ रूपये होते. त्यानंतर आज सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दार १ लाख ४७ हजार ५०९ रूपयांपर्यंत पोहचला. मात्र त्यानंतर सोन्याचा दर कोसळायला सुरूवात झाली.

Gold-Silver Rates Today
Gold Price Update: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सोन्यात 3,000 तर चांदीत 5,000 रुपयांची वाढ; आता खरेदी करायची की थांबायचं?

चांदीच्या दरात वेगाने घटन

सोन्याने अर्ध्या तासात आपली चाल बदलल्यानंतर चांदी देखील रेड झोनमध्येच ओपन झाली होती. तिथून चांदीचा दर घसरतच गेला. MCX सिल्वर प्राईस पाहिले तर शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी चांदीचे एक किलोचे दर २ लाख ३७ हजार ४१० होता. त्यात घट होऊन आता तो दर २ लाख ३६ हजार ००१ रूपये प्रती किलोग्राम झाला आहे. एका झटक्यात १४०९ रूपये दर घसरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news