Gold Silver Rate: मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोन्या-चांदीचे भाव कोसळले; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक वर्ष सोने खरेदी टाळा’ या आवाहनानंतर आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली. अनेक शहरांमध्ये सोन्याचे दर 200 ते 250 रुपयांनी कमी झाले.
Gold Silver Rate Today
Gold Silver Rate TodayPudhari
Published on
Updated on

Gold Silver Rate Today: गेल्या आठवड्यात भारतात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर नीचांकी पातळीवर गेले होते, मात्र शेवटी त्यात पुन्हा जोरदार रिकव्हरी झाली. आता नवीन ट्रेडिंग आठवड्याच्या सुरुवातीलाच, म्हणजे 11 मे 2026 रोजी, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये किरकोळ घसरण दिसून आली आहे.

दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्याचवेळी चांदीच्या दरातही थोडी घसरण दिसून येत आहे.

मोदींच्या आवाहनानंतर चर्चेला उधाण

रविवारी हैदराबादमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना परकीय चलन वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करण्याचं आवाहन केलं. त्यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणं, अनावश्यक परदेश प्रवास टाळणं, खाद्यतेलाचा वापर कमी करणं आणि विशेष म्हणजे एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं.

मिडल ईस्टमधील तणाव, इराण-अमेरिका संघर्षाची शक्यता आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत भारताचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे.

आजचे सोन्याचे दर किती?

आज दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,500 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोनं 1,39,800 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत यात सुमारे 250 रुपयांची घट झाली आहे.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोनं 1,39,650 रुपयांवर आहे. येथेही दरात सुमारे 200 रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Today
PM Modi Appeal: देश आर्थिक संकटात? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय काय सांगितलं? A to Z माहिती जाणून घ्या

चांदीच्या दरातही घसरण

भारतामध्ये आज चांदीचा सरासरी दर सुमारे 2,74,900 रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत प्रति किलो 100 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये चांदीचा दर 2,74,900 रुपयांवर आला आहे. मात्र, चेन्नई आणि हैदराबादमध्ये चांदीचा भाव 2,80,000 रुपयांवर स्थिर आहे.

सोने-चांदीचे दर का घसरले?

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ‘एक वर्ष सोने खरेदी टाळा’ या आवाहनाचा परिणाम बाजारावर झाल्याचं बोललं जात आहे.

जर लोकांनी खरेदी कमी केली, तर मागणी कमी होईल आणि त्याचा परिणाम थेट किमतींवर होऊ शकतो. त्यामुळे काही गुंतवणूकदार आणि व्यापारी सावध झाले आहेत.

Gold Silver Rate Today
RCB IPL Champion: RCB पुन्हा IPL चॅम्पियन होणार? 10 वर्षांनंतर भुवीचा कमाल योगायोग; 2016 ला काय घडलं होतं?

बाजारात अशीही चर्चा आहे की, जर सोन्याची आयात कमी झाली नाही तर सरकार आयात शुल्क वाढवू शकते. त्यामुळे काही व्यापारी आणि गुंतवणूकदार नफा वसूल करण्यासाठी जास्त किमतींवर सोन्याची विक्री करत असल्याचं मानलं जात आहे.

विशेष म्हणजे, सोन्याचा भाव आधीच प्रति 10 ग्रॅम 1.5 लाख रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे आता अनेक गुंतवणूकदार ‘नफा बुक’ करण्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र दिसत आहे.

पुढे काय?

सध्या जागतिक आर्थिक अनिश्चितता, मिडल ईस्टमधील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांच्याही नजरा आता पुढील काही दिवसांतील बाजाराच्या हालचालींकडे लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news