

Gold Silver Price Today: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (2 एप्रिल) सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी विक्रमी पातळीवर असलेले दर आता अचानक खाली आले असून गुंतवणूकदारांसाठी हा मोठा बदल मानला जात आहे.
Multi Commodity Exchange (MCX) वर 5 जून 2026 एक्सपायरी असलेल्या गोल्ड फ्युचर्समध्ये सुमारे ₹3,200 ची घसरण झाली.
सकाळी बाजार उघडताना सोनं ₹1,52,490 प्रति 10 ग्रॅमवर होतं. मात्र सकाळी 9:55 वाजेपर्यंत ते 2% पेक्षा जास्त घसरून ₹1,50,495 वर ट्रेड करत होतं.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. MCX वर चांदीचा दर सुमारे ₹11,900 ने घसरून ₹2,43,501 प्रति किलोपर्यंत खाली आला. ही जवळपास 5% घसरण मानली जात आहे.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,53,110 प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट ₹1,40,360 आणि 18 कॅरेट ₹1,14,870 वर आहे.
मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोनं ₹1,52,960, 22 कॅरेट ₹1,40,210 आणि 18 कॅरेट ₹1,14,720 दराने विकलं जात आहे.
चांदीबाबत बोलायचं झालं तर, दिल्लीमध्ये 10 ग्रॅम चांदी ₹2,551, तर मुंबई आणि कोलकात्यात सुमारे ₹2,500 दराने मिळत आहे.
जागतिक बाजारातील अस्थिरता, युद्धसदृश परिस्थिती आणि गुंतवणूकदारांची बदलती रणनीती यामुळे या घसरणीचा परिणाम दिसत आहे. काही दिवसांपासून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळलेले गुंतवणूकदार आता नफा बुक करत असल्यानेही दरांवर दबाव आला आहे.
सोनं-चांदीच्या दरात झालेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी संधी आणि धोका दोन्ही ठरू शकते. आता पुढील काही दिवसांत जागतिक परिस्थिती आणि बाजारातील ट्रेंड यावर या दरांची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.