Foreign investment : विक्रमी थेट विदेशी गुंतवणूक

Foreign investment : विक्रमी थेट विदेशी गुंतवणूक
Published on
Updated on

गेल्या आठवड्यात गुरुवारी 18 नोव्हेंबरला बाजार बंद होताना निर्देशांक 59,636 अंकांवर बंद झाला; तर निफ्टी 17,764 वर स्थिरावला. (Foreign investment) हवामानाप्रमाणेच निर्देशांक व निफ्टी खाली-वर होणे स्वाभाविक आहे. काहीतरी राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थितीत फारसे बदल झाले नसले, तर निर्देशांक व निफ्टी खाली-वर व्हायला काही कारण मिळत नाही. काही महत्त्वाच्या शेअर्सचे भाव गुरुवारी 18 नोव्हेंबरला बाजार बंद होताना खालीलप्रमाणे होते.

हेग 2048 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 318 रुपये, मन्नापुरम फायनान्स 184 रुपये, बजाज फिनान्स 7484 रुपये, फिलीप्स कार्बन 230 रुपये, इंडियन ऑईल कार्पोरेशन 129 रुपये, जिंदाल स्टील 370 रुपये, मुथुट फायनान्स 1603 रुपये, केइआय इंडस्ट्रीज 1036 रुपये, लार्सन अँड टुब्रो 1898 रुपये, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक 7147 रुपये, इंटलेक्ट डिझाईन एरिना 673 रुपये, बी.पी.सी.एल. 405 रुपये, ग्राफाइट 479 रुपये, हिंदुस्थान पेट्रोलियम 323, एस.बी.आय. 503 रुपये, स्टील स्ट्रीप्स 903 रुपये पी.एन.बी. हाऊसिंग 457 रुपये, भारती एअरटेल 714 रुपये, पिरामल एंटरप्राइझेस 2551 रुपये, हाऊसिंग डेव्हलपमेंट फिनान्स कार्पोरेशन (HDFC) 2925 रुपये.
एचडीएफसीचा नक्त नफा सतत वाढत असल्यामुळे या शेअरमध्ये अजूनही 20 टक्के भाववाढ होऊ शकते.

यावर्षी बर्‍याच कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्री केली. या भाऊगर्दीत उगीचच आपला घोडा नाचवायला नको म्हणून एलआयसीने आपली समभाग विक्री थोपवून धरली आहे. पण मार्च 2021-022 आर्थिक वर्ष संपायच्या आत ही विक्री जाहीर होईल. एल.आय.सी.चे एकूण एजंटस् बघताना, त्यांनी कितीही मोठा इश्यू काढला तरी त्याला भरपूर मागणी येईल.

एलआयसीची प्राथमिक समभाग विक्री 2022 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) येईल. हा इश्यू 25000 कोटी रुपयांइतका मोठा असेल. पेटीएमनंतर देशातील हा सर्वांत मोठा आय.पी.ओ. असू शकेल. या आय.पी.ओ.चा 10 टक्के भाग कंपनीच्या ग्राहकांसाठी आरक्षित केला जाण्याची शक्यता आहे. एल.आय.सी.ची सुरुवात 1956 साली सर सी. डी. देशमुख यांनी केली. सुरुवातीला एल.आय.सी.चे भागभांडवल 5 कोटी रुपये होते. सध्या एल.आय.सी.चे भरणा झालेले भांडवल (पेड अप कॅपिटल) 100 कोटी रुपये आहे.

केंद्र सरकारच्या मालकीच्या ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन (ONGC) ने एका तिमाहीत सर्वाधिक नक्त नफा मिळवण्याचा मान घेतला आहे. सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीला 18 हजार 347 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यापूर्वी हा मान इंडियन ऑईल कार्पोरेशनला मिळाला होता. (Foreign investment)

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत (सप्टेंबर 2021) वितरित केलेली कर्जे आणि बँकेतील ठेवी याबाबतीत सर्व सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अग्रणी ठरली आहे. महाराष्ट्र बँकेने जुलै ते सप्टेंबर 2021 या दुसर्‍या तिमाहीत 1 लाख 15 हजार 236 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. सप्टेंबर 2020 च्या तिमाहीपेक्षा महाराष्ट्र बँकेने या वर्षीच्या या तिमाहीत वितरित केलेल्या कर्जात 11.46 टक्के वाढ दिसून आली आहे.

या बँकेत मी 36 वर्षे कार्यरत होतो. त्यातील शेवटची सहा वर्षे मी कार्यकारी संचालक व अध्यक्ष म्हणून काम केले. पुण्यातील 'लोकमंगल' या इमारतीचे उद्घाटन त्यावेळचे पंतप्रधान माननीय श्री. मोरारजी देसाई यांनी केले होते, तर 1981 साली महाराष्ट्र राज्यातील 500 व्या शाखेचा शुभारंभ श्रीमती इंदिरा गांधी यांनी केला होता. एकाच राज्यात 500 पेक्षा जास्त शाखा असलेली पहिली बँक होण्याचा बहुमान या बँकेला तेव्हा मिळाला.

सरकारी कर्जरोख्यातील गुंतवणूक आता कुठल्याही नागरिकाला करता येते. याबद्दलचे सूतोवाच काही वर्षांपूर्वी अरुण जेटली यानी अर्थमंत्री असताना केले होते. गेल्या सात वर्षांत (पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत) विक्रमी थेट विदेशी (Foreign investment) गुंतवणूक (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) आल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विश्वासार्हतेची ही एक पावतीच आहे.

स्विस ब्रोकरेज कंपनी

'युनियन बँक ऑफ स्विझर्लंड' (यु.बी.एस.) ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वाढीचा दर 9.5 टक्के केला आहे. जागतिक अनेक प्रगत राष्ट्रांपेक्षाही टक्केवारी कितीतरी अधिक आहे.

पीआय इंडस्ट्रीज

यावेळचा चकाकता हिरा म्हणून 'पी.आय. इंडस्ट्रीज'ची निवड केली आहे. या शेअरचा सध्याचा भाव 2800 रुपये आहे. वर्ष-सव्वा वर्षात तो 3350 रुपयांच्या आसपास होईल. कंपनीचा EBITDA (Earning Before Interest Taxation Depreciation Amortization) सप्टेंबर 2021 तिमाहीअखेर 292 कोटी रुपये होता. गेल्या तीन वर्षांत कंपनीचा व्यवसाय 49 टक्क्याने वाढला आहे. अशीच वाढ यापुढेही होत राहील. अ‍ॅग्रो केमिकल (कृषी रसायन)क्षेत्रात तिचे काम आहे. कीटकनाशकांबद्दलचे तिचे संशोधन व विकास वाखाणण्याजोगे आहे.

तिचा नक्त महसूल 2020 आर्थिक वर्षासाठी 3366 कोटी रु. होता. 2021 मार्च वर्षात तो 4577 कोटी रु. झाला. 2022 मार्चला संपणार्‍या वर्षासाठी 5205 कोटी रु. व्हावा. 2023 आर्थिक वर्षासाठी तो 6075 कोटी रु. अपेक्षित आहे. या कंपनीचे शेअरगणिक उपार्जन 2020 मार्च वर्षअखेर 33 रु. होते. मार्च 2021 ला ते 48 रु. पर्यंत वाढले. 2022 मार्चअखेर ते 53 रु. व्हावे आणि 2023 मार्चअखेर ते 66 रु. अपेक्षित आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात अशा कंपन्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे हा शेअर गुंतवणुकीस योग्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news