Stock Market Boom | क्रूड ऑईल आणि डॉलरमध्ये घसरण; भारतीय शेअर बाजारात 'तेजीचा महापूर'

Stock Market Boom |
Stock Market Boom | क्रूड ऑईल आणि डॉलरमध्ये घसरण; भारतीय शेअर बाजारात 'तेजीचा महापूर'
Published on
Updated on

एकीकडे शांतता कराराचा मसुदा तयार होत असताना इस्रायलचे बैरूत आणि अमेरिकेचे इराणवर अचानक हल्ले आणि त्यामुळे ऑईलच्या दरामध्ये झालेली वाढ, यामुळे सप्ताह दोलायमान झालेला असतानाच अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ट्रम्पनी इराणवरचे हल्ले बंद करण्याचा आदेश जारी केला आणि लवकरच शांती करार होणार असल्याचा उल्लेख केला. सोबतच क्रूड ऑईल आणि डॉलरच्या भावातही घसरण झाली. या तिहेरी आनंदवार्तांनी बाजारात खरेदीचे उधाण आले आणि निफ्टी तब्बल दोन टक्के, सेन्सेक्स सव्वादोन टक्‍के तर निफ्टी बँक तीन टक्के उसळला. सर्व सेक्टोरल इंडायसेस हिरव्या रंगात रंगलेले सुखद चित्र कित्येक दिवसांनी बाजारात पाहायला मिळाले. Nifty IT आणि CPSE TM Flat to Negative राहिले.

निफ्टी बँक अखेरच्या दिवशी आणि पूर्ण सप्ताहातही तेजीत राहिला. सप्ताहात तो पाच टक्के वाढला. बँकांच्या शेअर्समध्ये तेजी म्हणजे FIIS च्या पुनरागमनाची नांदी असे समजावे काय? कारण, इतिहास तर तसेच सांगतो. बाजारातील तेजी आणि परदेशी गुंतवणूक संस्थांचे भारतीय बाजारात पुन्हा खरेदी सुरू करणे या दोन्ही गोष्टी बँकांच्या तेजीपासून सुरू होतात. या सप्ताहातील FII विक्रीचे आकडे पाहिले तर दिवसागणिक विक्री कमी होत गेलेली दिसते.

AU बँकेचा शेअर सप्ताहात सर्वाधिक साडेपाच टक्‍क्यांहून अधिक वाढून रु. १०१५.५० वर बंद झाला. या शेअरने ५ सप्टेंबर २०२५ रोजी रु. ५१३.५० हा वर्षातील नीचांक दाखवला होता आणि २४ एप्रिल २०२६ रोजी त्याने रु. १०७९.५५ हा उच्चांक दाखवला. म्हणजे केवळ साडेसात महिन्यात तो दुप्पट झाला. बँकेचे मार्च २०२६ चे आकडे पाहिले तर निव्वळ नफा, डिपॉझिटस्‌, कर्ज वितरण या सर्वांमध्ये भरघोस वाढ दिसून येते आणि त्याच वेळी NPA मध्ये लक्षणीय घट झालेली पाहायला मिळते. सुरक्षित आणि हमखास नफा मिळवून देणारा हा शेअर आहे.

एक महिन्याच्या अंतरानंतर SBI चा शेअर पुन्हा एकरा एक हजारच्या पार गेला. बँक निफ्टी वाढायचा असेल तर SBIN चा शेअर वाढायलाच हवा.

Financial Services शेअर्स मागील सप्ताहात वाढले. ही देखील तेजीचीच नांदी. Rural Consumption वाढत असेल तर Financial कंपन्यांचे शेअर्स वाढतात. सप्ताहात खालील शेअर्स चांगले वाढले.

Chola Finance - Rs. 1568.10 - 5.52%

Bajaj Finance - Rs. 918.30 - 5.02%

L & T Finance - Rs. 275.75 - 4.55%

shriram Finance - Rs. 954.95 - 4.28%

गेल्या महिन्यापासून Media Sector तेजीत आहे. त्यामधील उल्लेख करण्यासारखा शेअर म्हणजे Saregama India Ltd. मागील तीन महिन्यांपासून हा शेअर वाढतो आहे. एक Entertainment कंपनी असलेली ही कंपनी जगभरच्या Jen Z च्या Entertainment consumption चे प्रतीक आहे. विशेषतः Suregama Carvaan आणि Yoodlee Films या कंपनीच्या उपक्रमांनी कंपनीला लोकप्रियता मिळवून दिली आहे. शेअरचा शुक्रवारचा भाव आहे रु. ४६० आणि येत्या काही दिवसांत स्विंग ट्रेडर्सना हा शेअर लाभ मिळवून देईल असे वाटते. मागील सप्ताहात लिहिल्याप्रमाणे Zeel हा शेअर या आठवड्यातही ८ टक्के वाढला.

Nifty mid cap Index हा उच्चांकावर आहे आणि Small cap Index उच्चांकाच्या समीप जात आहे. अशा वेळी बाजारात All time high किंवा 52 week high चा उच्चांक नोंदवणाऱ्या शेअर्सची संख्या वाढत आहे. मागील सप्ताहातही बऱ्याच शेअर्सनी असा उच्चांक नोंदवला. त्यापैकी प्रमुख शेअर्स खालीलप्रमाणे :

1) Timex Group - rs. 493.75

2) GVT & D - Rs. 4942.50

3) Sigma Advanced System - Rs. 479.05

4) Vivid Electomech - Rs. 1082.55

5) Kernex microsystems - Rs. 1993.30

6) Marico - Rs. 816.55

7) Nippon Life India - Rs. 1087.55

8) Apar Industries - Rs.

152 21

9) R R Kabel - Rs. 2168.20

10) CG Power - Rs. 914.45

Genx AI Analytics Ltd. हा शेअर शुक्रवार, दिनांक १२ जून रोजी NSE SME platform वर नोंदणीकृत झाला. शेअरची इश्यू प्राईस रु. ११६ आणि लॉट साईझ १२०० होता. रु. ५५ कोटींचा हा छोटा IPO इश्यू होता. शेअरचे लिस्टींग २० टक्के खाली रु. ९२.८० ला झाले आणि दिवसअखेर तो रु. ९७.४० वर बंद झाला.

या शेअरची नोंदणी थोडी नकारात्मक झाली असली तरी ज्यांना भविष्यातील मल्टीबॅगर शोधायचे आहेत, त्यांनी या कंपनीकडे लक्ष द्यावे. Artificial intelligence, Enterprise performance management (EPM) आणि ERP Solutions या क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे. केवळ तीनच वर्षांत कंपनीचा इन्कम ७४ टक्क्यांनी वाढला आहे. EBITDA सात पट तर करोत्तर नफा ८५२ वाढला आहे.

चांगल्या मायक्रो कॅप कंपन्यांचे शेअर्स शोधणे, त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणे, त्यांच्या तिमाही निकालांचा अभ्यास करणे आणि त्यांच्यामधील गुंतवणूक वाढवत जाणे हा आपल्या गुंतवणूक प्रवासातील अभ्यासाचा, शिस्तीचा आणि कष्टाचा भाग असतो. जिद्दीने आणि चिकाटीने तो अंमलात आणला तर गुंतवणुकीतील अमाप लाभापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही.

Aarvi Encon Ltd. ही इंजिनिअरिंग कंपन्यांना स्टाफ पुरवणारी कंपनी आहे. कंपनीचा शुक्रवारचा भाव रु. १४५.९० आहे. एक वर्षाच्या Consolidation नंतर शेअरने ब्रेक आऊट दिला आहे. असेच काही इतर शेअर्स पाहा.

1) Silkflex Polymers - Rs. 222

2) Shreeji Shipping Global - Rs. 483

3) Asarfi Hospital - Rs. 229.20

चांगल्या कंपन्यांचे शेअर्स बाजाराच्या प्रवासात काही वेळा घसरतात. त्यांचे फंडामेंटल्स आणि तिमाही आकडे उत्कृष्ट असतात. काही असे शेअर्स खाली देत आहोत. त्यांनी 52 Week Low चा नीचांक नोंदवून आता ते Rebound होण्याच्या प्रयत्नात आहेत.

Coromandel International - Rs. 1916.70

Tata Elxsi - Rs. 4075

Indraprastha Gas - Rs. 162.83

Jindal Stainless Ltd. - Rs. 696

LTI Mindtree (LTM) - Rs. 3850.70

Natco Pharma - Rs. 864

Gulf Oil Lubricants - Rs. 941

Infollion Research services - Rs. 174

Srivari spices & Foods - Rs. 209

Master components - Rs. 348

वरील यादीतील शेवटचे तीन शेअर्स हे मायक्रो कॅप शेअर्स आहेत.

आठवड्यातील शेअर्स

येत्या सप्ताहात १५ जून रोजी मे महिन्याचा CPI Inflation Data येईल. १७ जून रोजी US Federal Reserve कडून व्याज दर घोषित होतील. फेडरल रिझर्व्हचे नवीन चेअरमन केविन वॉर्श यांची ही पहिलीच पॉलिसी असेल. बाजाराची दिशा बहुतांशी या दोन इव्हेंटसनी ठरेल. अमेरिका-इराण करार प्रत्यक्षात आला, निदान युद्ध थांबले आणि क्रूड ऑईलचे दर स्थिर झाले तरी बाजार वरची दिशा पकडण्याचा प्रयत्न करील. शुक्रवारच्या तुफानी तेजीमुळे निफ्टी २४००० पर्यंत विनासायास जाईल असे वाटते. बँकिंगमधील Heavy Weights बाजाराला वर जाण्यास सहाय्य करतील. जोडीला Technology, Chemical आणि Electronics शेअर्स आहेतच. त्यासाठी खालील शेअर्सवर लक्ष ठेवा. Apar Industries - Rs. 15160 Navin Fluorine - Rs. 7303

Polycab - Rs. 9554 Data Patterns - Rs. 4545.70

Thermax - Rs. 4726.30

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news