तेजीचा वाढता आलेख

तेजीचा वाढता आलेख
तेजीचा वाढता आलेख
Published on
Updated on

बुधवार, दि. 31 मे 2023 रोजी मासिक सत्र संपले आणि गुरुवार, दि. 1 जून 2023 रोजी नवीन महिन्याचा प्रारंभच weekly Expiry ने झाला. मे महिना भारतीय शेअर बाजारात आस्ते कदम येणार्‍या तेजीची ललकार देऊन गेला. प्रमुख निर्देशांक निफ्टी-50, मे महिन्यात 2.13 टक्के, तर सेन्सेक्स 1.94% वाढला. निफ्टी स्मॉल कॅप 100 हा 5.98%, तर निफ्टी मिडकँप 100 हा सुद्धा 5.81% वाढला. निफ्टीचा Realty इंडेक्स 10.32% नी वाढून मे महिन्याचा स्टार परफॉर्मर ठरला. त्याला FMC 7.41 व Auto (8.32%) यांनी चांगली साथ दिली. मात्र निफ्टी Emergy (-1.09%) आणि PSU (-2.17%) हे निर्देशांक पिछाडीवर राहिले.

महागाईचे मोजमाप करणारे भारतीय निर्देशांक CPI (Conumer Price Index) आणि WPI (Whotesale Price Index) यांनी एप्रिल महिन्याच्या आकडेवाडीमध्ये सुखद धक्का दिला. CPI 4.70 पर्यंत खाली आला, तर WPI उणे .92% पर्यंत खाली आला. जागतिक बाजारांनाही भेडसावणार्‍या Debt Celing ची मर्यादा वाढवण्यावर रिपब्लिकन्स आणि डेमोक्रॅटस् यांच्यामध्ये एकमत झाले. या दोन्ही घटना इथून पुढच्या भारतीय बाजारासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. महागाईदर जसजसे खाली येऊ लागतील तसतशी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची आशा बळावेल आणि भारतीय बाजारात तेजीची बहार येईल. परकीय संस्थांकडून भारतीय बाजारात येणारा खरेदीचा ओघ हेच सांगतो आहे. मे 2023 मध्ये परकीय गुंतवणूक संस्थांनी भारतीय बाजारात 37316 कोटी रुपयांची शेअर्स खरेदी केली. गेल्या सहा महिन्यांतील परकीय संस्थांच्या खरेदीचा हा उच्चतम आकडा आहे.

Realty Sector जे मे महिन्यामध्ये Star Performer राहिले, त्याची Growth Story इथून पुढेही काही काळ चालू राहील. खासगी आणि परदेशी बँकांचा विस्तार, यश सेंटर्सचा विस्तार, मोठमोठ्या मॉल्सचा भारतीय बाजारातील प्रवेश या गोष्टी Commercial Properties च्या मागणीमध्ये वाढ घडवून आणत आहेत. तर वाढते शहरीकरण मध्यमवर्गीय तरुण-तरुणींची वाढती मासिक प्राप्ती या गोष्टी (Residenial Properties) च्या मागणीमध्ये वाढ घडवून आणत आहेत. ब्लॅकस्टीन या प्रथितयश आंतरराष्ट्रीय खासगी गुंतवणूक फर्मने अलीकडेच 3.8 लाख कोटी रु. भारतीय रिअल इस्टेट सेक्टरमध्ये गुंतवलेले आहेत. शिवाय 2030 सालापर्यत आणखी 1.7 लाख कोटी रु. गुंतवण्याचा तिचा इरादा आहे. लोढा (मॅक्रोटेक डेव्हलपर्स)आणि सोभा हे रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर्स मे 2023 मध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले. Rera कायद्यामुळे या सेक्टरमध्ये आलेली पारदर्शकता, टाऊनशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्टस्मध्ये 100 टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता, पंतप्रधान आवास योजनेसाठी 79000 कोटींची अर्थ संकल्पातील तरतूद या गोष्टींमुळे रिअल इस्टेट सेक्टरमधून नजीकच्या भविष्यकाळात भरघोस परताव्याची अपेक्षा आहे.

देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला रिअल इस्टेट सेक्टर हे फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरते. कारण या एका सेक्टरवर सिमेंट, मेटल, इन्फ्रा, हॉस्पिटॅलिटी, ऑटो आदी कित्येक सेक्टर्स अवलंबून असतात. भारतात तरी शेतीच्या खालोखाल रिअल इस्टेट सेक्टरच सर्वाधिक रोजगार देणारे सेक्टर आहे.

Oberoi Realry Ltd ही भारताच्या रिअल इष्टेट सेक्टरमधील एक अत्यंत प्रथितयश कंपनी आहे. शुक्रवार, दि. 3 जून रोजीचा तिच्या शेअरचा बंद भाव होता रु. 959. कंपनीची 5 वर्षांची सरासरी विक्री 27 टक्के, तर नफा 33% आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 17.77 टक्के गुंतवणूक या शेअरमध्ये केली आहे, तर 12.11 टक्के गुंतवणूक देशी संस्थांनी केली आहे. रिअल इस्टेट सेक्टरमधील तेजी पाहता, किमान 3 वर्षांच्या इराद्याने या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

भरत साळोखे,
संचालक, अक्षय प्रॉफ़ीट अँड वेल्थ प्रा.लि.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news