Bajaj Housing Finance शेअर्सची बाजारात दमदार एंट्री, दुप्पट झाला पैसा

बाजार भांडवल १ लाख कोटींवर
Bajaj Housing Finance
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सने सोमवारी (दि.१६) शेअर बाजारात दमदार एंट्री केली.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सने सोमवारी (दि.१६) शेअर बाजारात दमदार एंट्री केली. हा शेअर्स ११४ टक्क्यांच्या प्रीमियमवर सूचीबद्ध झाला आहे. त्याची इश्यू प्राइस ७० रुपये होती. त्या तुलनेत तो बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी तो प्रति शेअर्स १५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे. (bajaj housing finance share price today)

बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स १३ सप्टेंबर रोजी IPO बिडर्सना प्रति शेअर ७० रुपये या इश्यू किंमतीवर वितरीत केले होते. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हची उपकंपनी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) ६,५६० कोटी रुपयांचा आहे. हा IPO हा आत्तापर्यंतचा वर्षातील सर्वात मोठा मानला जात आहे. हा आयपीओ ऑफरवरील शेअर्सच्या जवळपास ६७ पट सबस्क्राइब झाला होता.

Bajaj Housing Finance चे बाजार भांडवल १.०७ लाख कोटींवर

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सच्या बाजारातील दमदार एंट्रीमुळे या कंपनीचे बाजार भांडवल १.०७ लाख कोटींवर पोहोचले. या शेअर्सची किंमत १६०.९२ च्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचली. ६,५६० कोटींच्या या IPO ला गेल्या आठवड्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. हा आयपीओला एकूण ३.२३ लाख कोटी सबस्क्रिप्शन मिळाले.

बजाज हाऊसिंग फायनान्स IPO ला क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर (QIB) श्रेणीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याआधी टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Tech IPO) ३,०३४ कोटी रुपयांच्या IPO ने एलआयसी (LIC) चा विक्रम मोडला होता. टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ २१ हजार कोटींचा होता. टाटा टेक आयपीओ (Tata Tech IPO) ला ६९.४३ पट ओव्हरसबस्क्राइब केले गेले होते.

Bajaj Housing Finance
Stock Market Updates | 'निफ्टी'चा नवा विक्रमी उच्चांक! 'सेन्सेक्स'ही तेजीत खुला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news