डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'Tariff'चा 'ऑटो' उद्योगाला धक्का, टाटा मोटर्सचे शेअर्स धडाम

भारतीय शेअर बाजारात तेजी, पण ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण
Auto shares
भारतीय ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज गुरुवारी मोठी घसरण झाली.(AI Image)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केलेल्या कार आणि हलक्या ट्रकवर २५ टक्के शुल्क (Trump Auto Tariff) लागू करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे जागतिक ऑटोमोबाईल उद्योगाला धक्का बसला. भारतीय ऑटो कंपन्यांनाही याचा मोठा फटका बसला. आज गुरुवारी शेअर बाजारात आटो कंपन्यांचे शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ची मूळ कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स (Tata Motors Share Price) ५ टक्क्यांहून अधिक घसरले.

जग्वार लँड रोव्हरसाठी अमेरिका ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. २०२४ च्या आर्थिक वर्षाच्या जग्वार लँड रोव्हरच्या वार्षिक रिपोर्टनुसार, त्यांच्या एकूण उत्पादन विक्रीपैकी २२ टक्के विक्री ही अमेरिकेच्या बाजारपेठेतून झाली आहे.

टाटा मोटर्सचे शेअर्स गडगडले

निफ्टी ऑटो निर्देशाकात घसरण झाली आहे. निफ्टी ऑटोवर टाटा मोटर्स, Motherson, अशोक लेलँड, एमआरएफ हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले आहेत. तर हिरो मोटोकॉर्प शेअर्स तेजीत व्यवहार करत आहे.

दरम्यान, गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने कालच्या घसरणीतून सावरत तेजीच्या दिशेने चाल केली. सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ३३० अंकांनी वाढून ७७,६२० वर पोहोचला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक जवळपास १०० अंकांच्या वाढीसह २३,५८० वर व्यवहार करत होता.

Sensex Today | कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर एलटी, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, टायटन, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत. तर दुसरीकडे टाटा मोटर्सचा शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरणीसह ६६१ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर सन फार्मा, एम अँड एम, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले आहेत.

Auto shares
‘एनएफओ’मध्ये नुकसान झालंय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news