8th Pay Commission Update: 8 व्या वेतन आयोगाबाबत जेपी मॉर्गनचा मोठा अंदाज... सरासरी 'इतकेच' हजार रूपये वाढणार पेन्शन अन् पगार?

8th Pay Commission JP Morgan : जागतिक ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गनने आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचा प्रत्येक महिन्याला सरासरी किती पगार वाढणार आहे याबाबत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
8th Pay Commission Update
8th Pay Commission Updatepudhari AI Image
Published on: 
Updated on: 

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्स यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जागतिक ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गनने याबाबत एक अंदाज व्यक्त केला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचा प्रत्येक महिन्याला सरासरी किती पगार वाढणार आहे याबाबत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच प्रत्येक लाभार्थ्याला किती एरियर मिळू शकतो याबाबत देखील जेपी मॉर्गन यांनी एक अंदाज वर्तवला आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission: कोणत्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पे पोहचणार २ लाख रूपयांपर्यंत? 8 व्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टर ४ ची मागणी

१.२ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा

जेपी मॉर्गन यांनी आपल्या इंडिया अक्विटी स्ट्रॅटजी रिपोर्ट २०२७ मध्ये हा अंदाज सादर केला आहे. त्या रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाचा जवळपास १.२ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्स यांना फायदा होणार आहे. सरकारवर वेतन, भत्ता आणि पेन्शनचा अतिरिक्त ताण हा आर्थिक वर्ष २०२८ आणि २०२९ मध्ये येणार असून एकूण ७.२ लाख कोटी रूपये अतिरिक्त ताण येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

फिटमेंट फॅक्टर १.८३, DA ही मूळ पगारात

जेपी मॉर्गनने आपल्या अंदाजात १.८३ फिटमेंट फॅक्टर आधार मानला गेला आहे. त्यामुळे सध्याच्या १८ हजार रूपये मूळ वेतन वाढून ते ३३ हजार रूपये होण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गन कंपनीच्या या अंदाजात १.८३ टक्के फिटमेंट फॅक्टर नुसार मूल वेतन हे ८३ टक्क्यांनी वाढल्याचे कागदावर दिसेल. मात्र ६० टक्के महागाई भत्ता हा मूळ वेतनात समाविष्ट होणार असा अंदाज त्यांनी वर्तवला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वास्तविक वेतनवाढ ही १४ टक्क्यांच्या आसपासच राहण्याचा अंदाज आहे. त्यानुसार सरासरी १५ हजार ४०० रूपये पगार वाढण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या आतच कर्मचारी निवृत्त झाला तर काय? जाणून घ्या पेन्शन अन् एरियरचं गणित

कर्मचाऱ्यांची ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी

केंद्रीय कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टर हा ३.८३ ठेवण्याची मागणी केली आहे. जर ही मागणी मंजूर झाली तर मूळ पगार हा १८ हजारावरून ६९ हजार रूपये वाढू शकतो. त्याचबरोबर कर्मचारी संघटनांनी वर्षाला पगारवाढीचा दर हा ३ टक्क्यांवरून ६ टक्के करण्याची मागणी केली आहे.

कधी लागू होऊ शकतो ८ वा वेतन

जेपी मॉर्गन कंपनीच्या अहवालातील अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगाची शिफारस १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी होऊ शकतात. मात्र वाढलेला पगार हा नोव्हेंबर २०२७ पासून सुरू होऊ शकतो. अशा परिस्थितीत जानेवारी २०२६ ते ऑक्टोबर २०२७ पर्यंत २२ महिन्यांचा एरियर्स द्यावा लागणार आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission Update: फिटमेंट फॅक्टर ४.०, सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, जर असं झालं तर पगार किती वाढणार?

अंदाजानुसार फक्त एरियरच जवळपास ४ लाख कोटी रूपये होऊ शकतो. याचे पेमेंट दोन वर्षांच्या कालावधीत केले जाण्याचा अंदाज आहे. २०२८ मध्ये ४० टक्के आणि २०२९ मध्ये ६० टक्के एरियर मिळण्याची शक्यता आहे. हा जेपी मॉर्गन कंपनीने वर्तवलेला अंदाज आहे. अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.