Children’s Fund : एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफीट फंड – इन्व्हेस्टमेंट प्लॅन | पुढारी

Children's Fund : एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफीट फंड - इन्व्हेस्टमेंट प्लॅन

लाला अमरनाथ हे नाव भारतीय क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे 1933 साली इंग्लंडविरुद्धच्या आपल्या सलामीच्या कसोटी सामन्यातच त्यांनी शतक ठोकले. मोहम्मद अझरुद्दीनने तर आपल्या पहिल्या सलग तीन सामन्यांत शतक झळकावण्याचा मान मिळवला. ज्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच अशी धडाकेबाज होते, त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. (Children’s Fund)

भारताच्या गुंतवणूक विश्वातही अलीकडे अशाच एका धडाकेबाज खेळाडूचे आगमन झाले आहे. ‘एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफीट फंड – इन्व्हेस्टमेंट प्लॅन’. 29 सप्टेंबर 2020 रोजी तो सुरू झाला आणि एका वर्षातच त्याने 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. म्हणजे केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांची रक्कम दुपटीपेक्षा अधिक झाली.

आता तुम्ही म्हणाल कोरोनापश्चात भारतीय शेअर बाजार गेल्या एका वर्षात तेजीतच होता. परंतु; या फंडाचा जो बेंचमार्क इंडेक्स आहे त्या crisil hybrid 35+65 Aggressive Index ने गेल्या एक वर्षात 30 टक्के रिटर्नस् दिले आहेत, तर या फंडाने जवळपास 100 टक्के! इंडेक्सपेक्षा साडेतीन पट अधिक परतावा आणि तोही आपल्या पहिल्याच वर्षात ही कामगिरी गुंतवणूकदारांना निश्चितच सुखावणारी आहे.

हा चिल्ड्रन्स फंड आहे. ‘Solution oriented funds’ हा एक प्रकार म्युच्युअल फंडांच्या वर्गवारीत आहे. त्यामध्ये रिटायरमेंट फंड्स आणि चिल्ड्रन्स फंड्स यांचा समावेश होतो. प्रासंगिक फंड (Contingency fund), अल्प ते मध्यम अवधीची उद्दिष्टे (उदा. वाहन खरेदी, परदेश प्रवास) आणि दीर्घकालीन उद्दिष्टे (घरखरेदी, मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्तीपश्चात उदरनिर्वाह) असा हा कोणाच्याही आर्थिक नियोजनाचा तीन खांबी तंबू असतो. त्यापैकी भारतात मुलांचे शिक्षण आणि त्यांचे करिअर हा सर्व पालकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तेवढाच चिंतेचा विषय आहे. (Children’s Fund)

शिक्षणावरील वाढता खर्च हा सर्व पालकांसाठी डोकेदुखीचा विषय होऊन बसला आहे. 2007 साली मेडिकल डिग्री मिळविण्यासाठी साडे पंधरा लाख रुपये खर्च येत होता. तोच 2017 मध्ये साडे एक्केचाळीस लाखांवर गेला. या क्षेत्रामध्ये 10 टक्के दरवाढ गृहीत धरली तर 2027 मध्ये मेडिकल डिग्री मिळविण्यासाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपये खर्चावे लागतील.

शिक्षणामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अपरिहार्यता, परदेशी शिक्षणाचे आकर्षण, खासगी कोचिंग क्लासेसचे अवास्तव स्तोम आणि आपल्या मुलांसाठी काहीही करण्याची पालकांची तयारी यामुळे हा खर्च असाच वेगाने वाढत राहणार आहे. आपल्याकडे पालक मुलांसाठी अतोनात काबाडकष्ट करतील. परंतु; भविष्याचा वेध घेऊन आर्थिक नियोजन करणे, त्यासाठी म्युच्युअल फंडांसारखे योग्य साधन निवडणे आणि आपल्या प्लॅनला उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत चिकटून राहणे या गोष्टी अभावानेच घडताना दिसतात.

हा फंड सुरू होऊन 14 महिने झाले आणि या 14 महिन्यांत या फंडाने 100 टक्के रिटर्नस दिले हे वर सांगितलेच आहे. फंडाची 31 ऑक्टोबरअखेर 89.80% गुंतवणूक इक्विटीमध्ये, 3.2% डेट साधनांमध्ये, तर 7.1% गुंतवणूक रोखीच्या साधनांमध्ये आहे. इक्विटीमधील 89.80% गुंतवणूक एकूण 31 शेअर्समध्ये विभागली आहे. (Children’s Fund)

Consumer goods, financial services Am{U Industiral manu facturing या तीन सेक्टर्समध्ये जवळपास 56 टक्के गुंतवणूक आहे. या फंडाने एक वर्षात जे असाधारण रिटर्नस दिले आहेत, त्याला स्मॉल कॅप्समधील मोठी गुंतवणूक हेच कारण असावे. कारण मागील एका वर्षात स्मॉल कॅप इंडेक्सने 66 टक्के, तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी 70 ते 80 टक्के रिटर्नस दिले आहेत.

या फंडाचे फंड मॅनेजर आहेत आर. श्रीनिवासन, दिनेश आहुजा आणि मोहित जैन. आर. श्रीनिवासन हे इक्विटी, दिनेश आहुजा डेट तर मोहित जैन परदेशी गुंतवणुकीची धुरा वाहतात. आर. श्रीनिवासन हे एक प्रथितयश आणि दीर्घ अनुभव अलेले फंड मॅनेजर आहेत. एसबीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे दोन अत्यंत यशस्वी फंड एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड आणि एसबीआय स्मॉल कॅप फंड यांचेही व्यवस्थापन तेच पाहतात.

ज्यांना आपल्या पाल्यांच्या भविष्याची चिंता आहे, त्यांनी या फंडात गुंतवणूक करावी. दीर्घकालीन नियोजनासाठी SIP चा फार चांगला उपयोग होतो. हा चिल्ड्रन्स फंड असल्यामुळे पाच वर्षांचा लॉक इन कालावधी या फंडामध्ये आहे, तसेच पाल्याच्या नावे बँकेमध्ये सेव्हिंग खाते असणे सेबीच्या नियमानुसार बंधनकारक आहे.

Back to top button