Stock Market Opening Bell : शेअर बाजाराची ‘सावध’ चाल, सेन्सेक्स-निफ्टी किंचित घसरणीसह उघडले

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाई डेस्‍क : सकारात्मक जागतिक संकेत मिळत असतानाही आज ( दि.११) देशांतर्गत शेअर बाजाराने  सावध सुरुवात केली. सेन्सेक्स-निफ्टी किंचित घसरणीसह उघडले. सेन्सेक्स जवळपास 80 अंकांनी घसरला आणि 76,400 च्या वर उघडला. निफ्टी सुमारे 15 अंकांनी घसरून 23,245 च्या आसपास उघडला आणि बँक निफ्टी 200 अंकांच्या घसरणीसह 49,800 च्या वर उघडला आहे.

 आज प्रारंभीच्‍या व्‍यवहारात सुमारे 1760 शेअर्संनी तेजी तर 563 शेअर्संनी घसरण अनुभवली. .117 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. निफ्टीवर, ओएनजीसी, एनटीपीसी, अपोलो हॉस्पिटल्स, नेस्ले आणि कोल इंडियाचे शेअर्स प्रामुख्याने लाभधारक शेअसर्सच्‍या यादीत समाविष्ट होते. तर  एशियन पेंट्स, श्रीराम फायनान्स, बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोटर्समध्‍ये घसरण झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news