Stock Market Closing Bell : ‘तेजी’चे वारे कायम, आज शेअर बाजारात काय घडलं?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणूक निकालानंतर आज (६ जून) सलग दुसर्‍या दिवशी शेअर बाजारातील तेजी कायम राहिली. व्यवहार संपेपर्यंत निफ्टी 201 अंकांनी वाढून 22,821 वर तर सेन्सेक्स 692 अंकांनी वाढून 75,074 वर बंद झाला. निफ्टी बँक 237 अंकांनी वाढून 49,291 वर बंद झाला. आज मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही जोरदार खरेदी झाली, गेल्या दोन दिवसांत पिछाडीवर पडलेल्‍या सरकारी कंपन्यांनी आज पुन्हा खरेदीने पुनरागमन केल्याचे दिसले. आयटी आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्संनी  सर्वाधिक वाढ नोंदवली.

आज शेअर बाजारात काय घडलं?

⦁ सलग दुसर्‍या दिवशी शेअर बाजारातील तेजी कायम
⦁ मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकात सलग दुसऱ्या दिवशी खरेदी
⦁ सरकारी कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी

बुधवारी 74,382 वर बंद झाल्यानंतर सेन्सेक्स आज सकाळी ९.४७ वाजता 400.42 अंकांच्या वाढीसह ७४,७४४.३०च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला, तर निफ्टी १२२.३१ (0.54%) अंकांनी वाढून २२,७४२.७४२च्या पातळीवर दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांच्या वाढीसह 83.41 रुपयांवर व्यवहार करत होता.मिडकॅप निर्देशांकात 800 अंकांची वाढ झाली. BHEL चे शेअर्स 8% ची वाढ नोंदवत आहेत. याशिवाय ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, बीपीसीएलमध्ये नफा नोंदवला जात आहे. एचयूएल, ब्रिटानियाचे शेअर्स तोट्यात होते.

'या' शेअर्संनी अनुभवली तेजी

निफ्टीवर, एचसीएल टेक्नॉलॉजीज, श्रीराम फायनान्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, टेक महिंद्रा आणि एसबीआय हे प्रमुख लाभधारक म्हणून हिरव्या रंगात बंद झाले. फार्मा आणि एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक पीएसयू बँक, आयटी, रियल्टी 3-5 टक्क्यांनी वाढल्याने हिरव्या रंगात बंद झाले. तर बीएसई मिडकॅप इंडेक्स 2 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप इंडेक्स 3 टक्क्यांनी वाढला. एनटीपीसी, एसबीआय आणि पॉवर ग्रिड सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्समध्ये २.५ ते ५ टक्‍के वाढले. टेक महिंद्रा, टाटा स्टील, विप्रो आणि एचसीएल टेक देखील वाढीसह उघडले, तर Hindalco Industries, HUL, Asian Paints, Hero MotoCorp आणि Nestle हे प्रमुख घसरणीत बंद झाले.

एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

सरकारी कंपन्‍यांच्‍या शेअर्समधील वाढ कायम आहे. सरकारी बँक, रेल्वे, संरक्षण साहित्‍य निर्मिती शेअर्समध्ये १० टक्‍के वाढ झाली आहे. सरकारी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या शेअर्समध्‍ये आज ५ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्‍थापनेचे संकेत मिळताच 'एसबीआय'च्या शेअर्सची खरेदी वाढली. आज ते निफ्टी 50 च्या टॉप गेनर्समध्ये होते.

चंद्राबाबू नायडूच्‍या 'हेरिटेज फूड'च्‍ शेअर्समध्‍ये लक्षणीय वाढ

लोकसभा निवडणूक निकालाचे पडसाद शेअर बाजारात उमटतातच. ४ जूनला निकाला दिवशी शेअर बाजाराने मोठी पडझड अनुभवली. यानंतर दुसर्‍या दिवशी भाजपप्रणित एनडीए सरकार येणार असल्‍याचे संकेत मिळताच आणि तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएसोबतच राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट करतातच बाजारात तेजी आली. आता आज चंद्राबाबू यांच्‍या हेरिटेज ग्रुप शेअर्समध्‍ये मागील काही दिवसांमध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी १९९२ मध्‍ये स्थापन केलेल्‍या हेरिटेज ग्रुप त्याच्या प्रमुख कंपनी हेरिटेज फूड्स अंतर्गत डेअरी, रिटेल आणि कृषी या तीन व्यवसाय विभागांमध्ये कार्यरत आहे. एन चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश हे हेरिटेज फूड्सच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. आज हेरिटेज फूड्सचे शेअर्स १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढून ६०१.६० रुपयांपर्यंत पोहोचले, या कंपनीच्‍या भाग भांडवलात ५,५०० कोटींहून अधिक बाजार भांडवल वाढवले आहे. सोमवारी शेअर 546.95 रुपयांवर स्थिरावला, दिवसभरात २० टक्‍के वाढ झाली.

हेरिटेज फूड्सने 'ट्रुली गुड' या ब्रँड नावाने शुद्ध तुपाच्या लाडूंचे उत्‍पन्‍न सादर केले आहेत. आंध्र प्रदेशमधील या फूड कंपनीची तिच्या उपकंपनी, हेरिटेज न्यूट्रिवेट लिमिटेड (HNL) पशुखाद्य व्यवसायातही कार्यरत आहे. गेल्या महिन्यात, हेरिटेज फूड्सचे शेअर्स ८९ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढले आहेत. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. सन 2024 मध्ये आतापर्यंत, स्टॉकमध्ये 150% पेक्षा जास्त उल्लेखनीय वाढ झाली आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत मूल्यात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news