पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान मंगळवारी मोठी पडझड झाल्यानंतर आज (५ जून) शेअर बाजार सावरला. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला, तर निफ्टी देखील 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. निफ्टी बँकेतही चांगली वाढ झाली आहे
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा बाजारावर झघला होता नकारात्मक परिणाम झाला. भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे कोरोनानंतरचया काळातील सर्वात मोठी घसरण बाजाराने अनुभवली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३१ लाख कोटी रुपयांची 31 लाख कोटी रुपयांची घट झाली. मात्र आज सुरुवातीच्या व्यवहारात बाजार सावरला. तर निफ्टी देखील 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला.
NSE चा निफ्टी 22,100 च्या वर उघडला. यामध्ये सुमारे दीडशे अंकांची वाढ झाली. त्याच वेळी, बीएसई सेन्सेक्सही 600 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला, दरम्यान, हिंदाल्कोने बाजारातील परिस्थिती पाहता आयपीओ पुढे ढकलल्याने कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. मार्केट डेब्यूमध्ये हिंदाल्कोचा शेअर 5 टक्क्यांनी घसरला. त्याची उपकंपनी नोव्हेलिसने बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा IPO पुढे ढकलला आहे.