शेअर बाजारात खरेदीचे सत्र कायम, सेन्सेक्स 73,738 वर बंद

शेअर बाजारात खरेदीचे सत्र कायम, सेन्सेक्स 73,738 वर बंद

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारपेठांमधील सकारात्‍मक संकेतामुळे आज (दि.२३) सलग तिसर्‍या दिवशी देशातंर्गत शेअर बाजारात खरेदीचे सत्र कायम राहिले. सकाळपासूनच बाजारने तेजी अनुभवली; अखेर आज बाजार बंद होताना धातू आणि औषध क्षेत्रातील दबावामुळे बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 89 अंकांनी वधारून 73,738 वर बंद झाला, तर तो इंट्राडेमध्ये 74,059 च्या पातळीवरही पोहोचला होता. निफ्टी 31 अंकांनी वाढून 22,368 वर बंद झाला. याआधी सोमवारी (दि.२२) सेन्सेक्स 560 अंकांनी वाढून 73,648 वर बंद झाला होता.

आज (दि.२३) देशातंर्गत शेअर बाजारात व्‍यवहार सुरु होताच सेन्सेक्स 200.90 अंकांनी किंवा 0.27 टक्क्यांनी वाढून 73,849.52 वर व्यवहार करताना दिसला. निफ्टी 64.10 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांनी वाढून 22,400.50 वर व्यवहार करत होता. आजच्‍या दिवसभराच्‍या व्‍यवहारात १७५८ कंपनीचे शेअर वधारले. तर ४२५ शेअर्संनी घसरण अनुभवली. ८४ शेअर जैसे थै राहिले.
आजच्‍या व्‍यवहारात भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, डॉ रेड्डीज लॅब्स आणि विप्रो सारख्या समभागांनी निफ्टीमध्ये मोठी वाढ केली. तर नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, आयशर मोटर्स, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठे नुकसान झाले.

टॉप गेनर, टॉप लूझर

भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, डॉ रेड्डीज लॅब्स आणि विप्रो सारख्या समभागांनी निफ्टीमध्ये मोठी वाढ केली. तर नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, आयशर मोटर्स, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठे नुकसान झाले.
निफ्टी ५० मध्ये भारती एअरटेल, टायटन, एनटीपीसी, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टाटा मोटर्स सर्वाधिक वाढले होते. तर हिंदाल्को, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, ब्रिटानिया आणि अदानी एंटरप्रायझेस हे 23 एप्रिल रोजी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 50 मध्ये मोठे नुकसान झाले.

व्होडाफोन-आयडिया शेअर्समध्‍ये एका दिवसात १४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ

कंपनीचा FPO बंद झाल्यानंतर Vodafone Idea चे शेअर्स एका दिवसात 14% पेक्षा जास्त वाढून 14.75 रुपयांच्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचले.

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर्समध्‍ये आठ टक्‍के घसरण

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने वितरित केलेल्या किरकोळ वाहन कर्जाच्या संदर्भात फसवणूक केवायसी दस्तऐवजांची बनावटगिरी करण्यात आल्‍याचा प्रकार उघड झाला. यामध्‍ये कंपनीच्या निधीचा अपहार झाला आहे या प्रकरणाचा तपास प्रगत टप्प्यावर आहे. कंपनीचा अंदाज आहे की, या फसवणुकीचा आर्थिक परिणाम रु. 150 कोटींपेक्षा जास्त होण्याची होणार नाही. या प्रकरणी तपास सुरु आहे. काही लोकांच्‍या अटकेची शक्‍यता असल्‍याचे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकेजवर भारती एअरटेल टॉप गेनर

भारती एअरटेल कंपनीने184 देशांमध्ये प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी आपला सरलीकृत आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक लाँच केल्यानंतर भारती एअरटेलच्या समभागांनी 2.7% वाढून 1,333.50 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. कंपनीने म्‍हटलं आहे की, ग्राहकाने एकापेक्षा जास्त पॅक निवडण्याची गरज नाही त्याऐवजी प्रवासाचा कालावधी निवडा आणि एकच पॅक वापरून कुठेही प्रवास करता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news