Parle-G | ‘पार्ले-जी की डार्क पार्ले-जी?’; आयकॉनिक बिस्किटच्या चॉकलेट फ्लेवरचा फोटो व्हायरल, ‘मीम्स’चा पाऊस | पुढारी

Parle-G | 'पार्ले-जी की डार्क पार्ले-जी?'; आयकॉनिक बिस्किटच्या चॉकलेट फ्लेवरचा फोटो व्हायरल, 'मीम्स'चा पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : पार्ले-जी हे देशातील सर्वाधिक आवडीचे बिस्किट आहे. गेली अनेक दशके त्याची लोकप्रियता टिकून आहे. हे बिस्किट प्रत्येकाने एकदा तरी खाल्ले आहे. ८५ वर्षे जुने असलेले हे बिस्किट चहाच्या वेळी स्नॅक म्हणून प्रसिद्ध आहेच. शिवाय ते देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ब्रँडपैकी एक आहे. सध्या पार्ले-जी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याला कारण म्हणजे ‘पार्ले-जी’च्या नवीन फ्लेवरचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. “डार्क पार्ले-जी” या नावाने तो इंटरनेटवर फिरू लागला आहे. यामुळे साहजिकच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अनेक सोशल मीडिया यूजर्संनी या आयकॉनिक बिस्किटच्या चॉकलेट फ्लेवरबद्दल अंदाज काढायला सुरुवात केली आहे. यावरुन मायक्रोब्लॉगिंग साइटवर मीम्स शेअर केले जात असून त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या जात आहेत. दरम्यान, पार्ले प्रॉडक्ट्सकडून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नसतानाही ‘डार्क पार्ले-जी’वरून X वर मीम्स, पोस्ट आणि त्यावर कमेंट्सचा पाऊस पाऊस सुरु आहे.

काही लोकांनी X वर अस्तित्वात नसलेल्या उत्पादनाची काल्पनिक रिव्ह्यूदेखील पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबतच्या मूळ ट्विटला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याला १० लाखांच्या जवळपास व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया यूजर्संनी त्यावर त्यांचे विचार पोस्ट केले आहेत. यूजर्संच्या एका वर्गाने असा अंदाज व्यक्त केला आहे की हा फोटो एकतर संपादित केला गेला आहे अथवा तो AI-जनरेटेड आहे.

“माझे बालपण आता उद्ध्वस्त झाले आहे,” असे एका यूजरने म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजर्सने “छान, चॉकलेट फ्लेवरसह असणे आवश्यक आहे” अशी टिप्पणी केली आहे.

“हे जेमिनी AI द्वारे जनरेटेड आहे,” असे तिसऱ्या एका यूजर्सने म्हटले आहे. “हे कुठेही पाहिले नाही, ते निश्चितपणे संपादित केले आहे,” असे चौथ्या युजर्सने नमूद केले आहे. हे तर स्वादिष्ट असल्याचे एकाने म्हटले आहे.

पार्ले प्रॉडक्ट्सकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसतानाही, लोक याची चव कशी असेल याबद्दल अंदाज लावत राहिले. दरम्यान, अधिकृत वेबसाइटवर डार्क पार्ले-जीचा कोणताही उल्लेख आढळून आलेला नाही. 

हे ही वाचा :

Back to top button