Share Market Closing Bell | चार सत्रांतील तेजीला ब्रेक! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; नेमके कारण काय? | पुढारी

Share Market Closing Bell | चार सत्रांतील तेजीला ब्रेक! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; नेमके कारण काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारात आज मंगळवारी काही प्रमाणात विक्री दिसून आली. एकूणच आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्सच्या चार सत्रांतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरून ७३,६७७ वर बंद झाला. तर निफ्टी ४९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,३५६ वर स्थिरावला.

क्षेत्रीय आघाडीवर आज संमिश्र कल दिसून आला. ऑटो निर्देशांक १ टक्क्यांनी, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. तर IT आणि FMCG निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.१७ टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप ०.६३ टक्क्यांनी खाली आला. (Share Market Closing Bell) बाजारात सर्वाधिक घसरण आयटी, मीडिया, मेटल आणि खासगी बँकिंग क्षेत्रात झाली. तर ऑटो, फार्मा आणि पीएसयू बँकिंगमध्ये खरेदी दिसून आली.

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे प्रत्येकी ४ टक्क्यांहून अधिक घसरले. इन्फोसिस, नेस्ले इंडिया, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, एचसीएल टेक हेही घसरले. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एसबीआय, सन फार्मा, एम अँड एम, एनटीपीसी हे शेअर्स तेजीत राहिले.

निफ्टीवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एसबीआय लाईफ हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, ओएनजीसी, बजाज ऑटो, सन फार्मा हे शेअर्स तेजीत राहिले.

IIFL Finance ला फटका, शेअर्स २० टक्क्यांनी घसरला

आजच्या ट्रेडिंग सत्रात आयआयएफएल फायनान्सचा शेअर्स गडगडला. हा शेअर्स एनएसईवर २० टक्क्यांनी घसरून ४७७ रुपयांपर्यंत खाली आला. आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला (IIFL Finance) तत्त्काळ गोल्ड लोन मंजूर करणे अथवा लोन वितरण थांबवण्यास सांगितले आहे. सोन्याची शुद्धता आणि निव्वळ वजन तपासण्यात आणि प्रमाणित करण्यात गंभीर विचलन तसेच कर्ज मंजूर करताना आणि लिलावाच्या वेळेस लोन टू व्हॅल्यू रेशो (एलटीव्ही) चे उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळून आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. (Share Market Closing Bell) आरबीआयच्या कारवाईनंतर IIFL Finance चे शेअर्स घसरले.

परदेशी गुंतवणूकदार

देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी ३,५४३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ५६४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

जागतिक बाजार

चीनने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मोठ्या प्रोत्साहन योजना जाहीर न केल्यामुळे मंगळवारी चिनी स्टॉक्स अडखळले. तसेच त्यांनी आशियाई समवयस्कांना त्यांच्यासोबत ओढले. परिणामी हाँगकाँगचा हँग सेंग सुरुवातीच्या व्यवहारात २ टक्क्यांनी घसरला. सोमवारी नवे शिखर गाठल्यानंतर मंगळवारी जपानच्या निक्केई निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. हा निर्देशांक ०.०३ टक्क्यांनी घसरून ४०,०९७ वर स्थिरावला. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.७ टक्क्यांनी घसरला. (Nikkei 225)

हे ही वाचा :

 

Back to top button