अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 501.20 अंक व 1384.96 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 21853.8 अंक आणि 72085.63 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.35 टक्के तर सेन्सेक्स निर्देशांकामध्ये 1.96 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली. सर्वाधिक वाढ होणार्‍या कंपन्यांच्या समभागांमध्ये भारत पेट्रोलियम (17.7 टक्के), पॉवर ग्रीड (12.9 टक्के), अदानी पोर्टस् (10.1 टक्के), ओएनजीसी (9.9 टक्के), अदानी एंटरप्राईझ (9.1 टक्के) थांबा, समावेश होतो, तर सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये एल अँड टी (-6.1 टक्के), टायटन (-4.2 टक्के), आयटीसी (-3.4 टक्के) बजाज फायनान्स (-.3.4 टक्के), भारती एअरटेल (-0.8 टक्के) या कंपन्यांचा अर्थसंकल्प सादर झाला. येत्या तीन महिन्यांत लोकसभा निवडणूक असल्याने निवडणुकीपश्चात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार. बाजारातील चढउतारांवर अर्थसंकल्पातील घोषणांचा परिणाम पाहायला मिळाला.

* या अंतरिम अर्थसंकल्पात प्राप्तिकर टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला नाही. परंतु, 2009-10 पर्यंतच्या आर्थिक वर्षासाठी 25 हजारांपर्यंतच्या करमागण्या तसेच 2010-11 ते 2014-15 यामधील 10 हजार रुपयांपर्यंतच्या प्राप्तिकर मागण्या (Tax Demand) केंद्र सरकारने परत घेण्याचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांत प्राप्तिकर भरणार्‍यांची संख्या 2.4 पटींनी वाढली असून, एकूण थेट कर संकलनाच्या रक्कमेत तिपटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 – 25 मध्ये थेट कराद्वारे 26.02 लाख कोटींचा महसूल सरकारला मिळणे अपेक्षित आहे. 1 कोटी करदात्यांना याचा फायदा होणार.

* संरक्षण मंत्रालयासाठी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद एकूण अर्थसंकल्पाच्या 13.04 टक्के म्हणजेच 6,21,540 कोटींचा निधी संरक्षण खात्यासाठी देण्यात आला आहे. अत्याधुनिक लढाऊ विमाने, दोन, युद्धनौका यांच्या उभारणी, खरेदी आणि आधुनिकीकरणासाठी हा निधी वापरला जाणार.

* रिझर्व्ह बँकेच्या ‘पेटीएम’ला धक्का. 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाकडून ठेवी स्वीकारणे, वॉलेटमध्ये पैसे भरून घेणे, फास्ट टॅग रिचार्ज करणे यांसारख्या सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. कंपनीचा नुकताच लेखापरीक्षण अहवाल (Audit Report) सादर झाला. हा अहवाल बाह्य लेखापरीक्षकांतर्फे करण्यात आल्याने पेटीएमच्या पेमेंट बँकसंबंधी नियमांचे पालन केले गेले नसल्याचे आढळले. यासंदर्भात समाधानकारक प्रतिसाद मिळेपर्यंत कारवाई चालू राहण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले. कारवाईची घोषणा होताच पेटीएमचा समभाग तब्बल सलग दोन दिवस 20 टक्क्यांनी घसरला. कंपनीचे भांडवल बाजारमूल्य तब्बल 17 हजार कोटी (सुमारे 2 अब्ज डॉलर्स) नी घसरले.

* महिला बचत गटासाठी असलेली ‘लखपती दीदी योजना’ची संख्या थेट 2 कोटींवरून 3 कोटींपर्यंत करण्यात आली आहे. यासाठी बचत गटांना दीड लाखाचे कर्ज दिले जाते. 15 ऑगस्ट 2023 ला याचा शुभारंभ करण्यात आला. एलईडीबल्ब बनवणे, इलेक्ट्रिक वस्तूंचे रिपेअरिंग, प्लबिंग यासारख्या तांत्रिक कौशल्यांचे योजनेत प्रशिक्षण दिले जाते. ज्या महिलांचे कुटंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा कमी आहे, त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

* 2024-25 साठी वित्तीय तुटीचे लक्ष एकूण ‘जीडीपी’च्या 5.1 टक्क्यांवर निर्धारित करण्यात आले आहे. 2026 सालापर्यंत वित्तीय तूट 4.5 टक्क्यांवर नियंत्रित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारला मिळणारा कर स्वरूपातील महसूल आणि सरकारतर्फे विविध योजनांवर केला जाणारा खर्च यातील तफावत म्हणजे वित्तीय तूट. कमीत कमी वित्तीय तूट सशक्त अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.

* देशातील महत्त्वाची सरकारी बँक ‘बँक ऑफ इंडिया’चा चालू आर्थिक वर्षाचा तिसर्‍या तिमाहीचा नफा 62 टक्के वधारून 1870 कोटी झाला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 2 टक्के घटून 5463 कोटी झाले. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 1.61 टक्क्यांवरून 1.41 टक्के झाले.

* देशातील महत्त्वाची चारचाकी उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी’चा तिसर्‍या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 33.1 टक्के वधारून 3130 कोटी झाला. कंपनीचा महसूल 14.7 टक्के वधारून 33309 कोटींवर पोहोचला.

* देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी ‘बँक ऑफ बडोदा’चा तिसर्‍या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 18.8 टक्के वधारून 4579 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 2.6 टक्के वधारून 11101 कोटींवर पोहोचले. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 0.99 टक्क्यांवरून 0.70 टक्क्यांपर्यंत खाली आले. नफ्यामध्ये वाढ प्रामुख्याने बँकेने वितरित केलेल्या कर्जांमध्ये झालेल्या वाढीमुळे झाली. देशांतर्गत कर्जवाटपमधील वर्षीच्या तुलनेत 13.4 टक्के वाढून 8 लाख 62 हजार कोटी झाले. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कर्जवाटप 13 टक्के वधारून 10.49 लाख कोटी झाले.

* सरकारी कंपनी ‘एनटीपीसी’ महाराष्ट्रात तब्बल 80 हजार कोटींची गुंतवणूक करणार. ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी’ ही उपकंपनी महाराष्ट्रात पर्यावरणपूरक ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारणार. यासोबतच सौर आणि वायू ऊर्जा उत्पादन प्रकल्प उभारणार. यासोबतच सौर आणि वायू ऊर्जा उत्पादन प्रकल्पदेखील जोडीने उभारले जाणार. केंद्र सरकारने आयात केल्या जाणार्‍या महाग खनिज तेलाला पर्याय म्हणून ग्रीन हायड्रोजन मिशन अमलात आणले. याअंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी रिलायन्स, जोएसडब्लू एनर्जी, बीपीसीएल यांसारख्या 14 बलाढ्य कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.

* पायाभूत सुविधा क्षेत्र उभारणीतील बलाढ्य कंपनी एल अ‍ॅड टीचा तिसर्‍या तिमाहीचा नफा 15.5 टक्के वधारून 2948 कोटी झाला. प्रॉफिट मार्जिन 5.5 टक्क्यांवरून 5.3 टक्क्यांपर्यंत खाली आले.

* 31 मार्च 2024 पर्यंत स्थापन झालेल्या स्टार्टअप कंपन्यांना आपल्या ताळेबंदातील तोटा 10 वर्षांपर्यंत पुढे नेता (Corry Forward) येणार. याआधी हा फायदा केवळ 31 मार्च 2023 आधी स्थापन झालेल्या स्टार्टअप कंपन्यांना होता. तसेच स्थापनेपश्चात पुढील तीन वर्षांपर्यंत कर सवलत मिळेल. 31 मार्च 2023 पूर्वी स्थापलेल्या स्टाटर्र्अपसाठी ही कर सवलत लागू असेल.

* 26 जानेवारीअखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेशी चलन गंगाजळी 591 दशलक्ष डॉलर्सनी घटून 616.733 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button