क्रेडिट युटिलायझेशन रेशोचे नियोजन ‘अशा’ पद्धतीने करा, जाणून घ्या अधिक | पुढारी

क्रेडिट युटिलायझेशन रेशोचे नियोजन 'अशा' पद्धतीने करा, जाणून घ्या अधिक

प्रतीक्षा पाटील

क्रेडिट युटिलायझेशन रेशो (सीयूआर) म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची ( Credit Card ) क्रेडिट मर्यादा एका महिन्यात किती वापरता. सीयूआरचा क्रेडिट स्कोअरशी खूप संबंध आहे.

संबंधित बातम्या 

तुम्ही क्रेडिट कार्ड किती वापरता यावर तुमचा सीयूआर अवलंबून आहे. तुम्ही जितके क्रेडिट कार्ड वापराल, तितका तुमचा सीयूआर जास्त असेल. उदाहरणार्थ, तुमच्या क्रेडिट कार्डवर 2 लाख रुपये क्रेडिट लिमिट आहे. जर तुम्ही यामधील 30,000 रुपये खर्च केले तर तुमचा सीयूआर 15 टक्के होईल. क्रेडिट लिमिटचा जास्त वापर झाल्यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी, क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30 टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यावरून कळतं की, तुम्ही क्रेडिट कार्डवर जास्त अवलंबून नाही. क्रेडिट युटिलायझेशन रेशोचे नियोजन कशा पद्धतीने करता येईल याचे विविध मार्ग पडताळून पाहूया.

क्रेडिट युटिलायझेशन रेशोविषयी काही समस्या उद्भवली तर सर्वात सोपा आणि वेगवान क्रेडिटचा उपाय म्हणजे क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून घेणे.

दुसरे क्रेडिट कार्ड मिळवणे हा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढवण्याचा सोपा मार्ग आहे. अर्थातच, नवे क्रेडिट कार्ड मिळवणे म्हणजे खर्च करण्याची परवानगी नव्हे. दोन कार्ड बाळगण्याचे कारण इतकेच की, खरेदी करताना ती दोन्ही कार्डांवर विभागली जाऊन एकाच कार्डावर अधिक खर्च दिसणार नाही. अनेक क्रेडिट कार्ड हाताळणे आणि त्यावरून होणार्‍या खर्चावर लक्ष ठेवणे तसे कठीण काम आहे आणि हे सर्व फक्त डोक्यात ठेवून करत असतात, तर ते थोडेसे गोंधळवून टाकणारे असते.

त्यामुळे अनेक क्रेडिट कार्डांची खाती सांभाळण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकते. त्यासाठी कार्डावरील क्रेडिट युटिलायझेशन मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर ई-मेल किंवा एसएमएसद्वारे आपल्या सूचित करण्यासाठी बँकेला सूचना द्यावी. त्यामुळे उपलब्ध क्रेडिट लिमिटच्या वीस टक्क्यांपर्यंत पोहोचपर्यंत आपण स्वतःसाठी एक मर्यादा आखून घेऊ किंवा आठवण राहावी म्हणून नोंद करून ठेवू. त्यामुळे मनाची तयारी ठेवू शकतो आणि थोडासा कालावधी असल्याने आपल्या मर्यादा सुटणार नाहीत.

या सर्व गोष्टी जर किचकट वाटत असतील, तर थोडा सोपा मार्गही अवलंबता येईल. त्यासाठी दिलेल्या मुदतीच्या मधल्या काळात काही पैसे भरता येऊ शकतात. थोडक्यात, महिन्यातून एकदाच पैसे भरण्याऐवजी महिन्यातून दोनदा रक्कम अदा करून टाकायची. त्यामुळे 30 टक्के क्रेडिट युटिलायझेशनची मर्यादा कधीच ओलांडली जाणार नाही.

Back to top button