पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक भांडवली बाजारांमधून मिळणार्या सकारात्मक संकेत भारतीय शेअर बाजारावर दिसले. सेन्सेक्स आज (दि.११) 69,925.63 च्या पातळीवर उघडला. काही वेळातच 70,000 चा आकडाही पार केला. मात्र काही तासांमध्ये प्रमुख बाजार निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावरून घसरही अनुभवली. अखेर बाजार बंद होताना सेन्सेक्स 69,921.82 वर बंद झाला. तर निफ्टी 20,994.50 वर स्थिरावला. याआधी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 303 अंक वधारत 69,825 वर बंद झाला होता.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज शेअर बाजारात किंचित वाढ होऊन उत्साहाने व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स 69,925.63 च्या पातळीवर उघडला; पण यानंतर त्याने 70000 च्या विक्रमी पातळीलाही स्पर्श केला. निफ्टीही 21026 चा विक्रमी उच्चांक गाठला. मात्र यानंतर त्यांनी घसरण अनुभवली.
आज शेअर बाजारातील प्रारंभीच्या व्यवहारात बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. तर विक्रीमुळे फार्मा आणि ऑटो शेअर्संनी घसरण अुनभवली.
शेअर बाजारात खरेदीचा मूड कायम राहिला आहे. आजच्या व्यवहारात बँक निफ्टीमध्ये अधिक गती दिसून आली. मिडकॅप शेअर्सची घोडदौड कायम राहिली.सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून येत आहे. कॅनरा बँक आणि पीएनबीच्या शेअर्संनी तेजी अनुभवली.
सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कोल इंडिया, ओएनजीसी, इंडसइंड बँक, यूपीएल आणि अल्ट्राटेक सिमेंट NSE निफ्टी 50 वर नफ्यात आघाडीवर राहिले. तर सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 223.30 अंकांची उसळी घेत 70,048.90 च्या विक्रमी उच्चांक गाठला.
स्वस्त कच्चे तेल म्हणजे आर्थिक ताण कमी करणारा ठरतो. कच्च्या तेलाचा आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा इनपुट म्हणून वापर करणाऱ्या कंपन्यांवरही त्याचा परिणाम दिसतो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे आज बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला.
BSE सेन्सेक्सने आज (दि. 11) 70,057.83 चा सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सला 60 हजार ते 70 हजारपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यास सुमारे एक वर्ष 5 महिन्यांचा कालावधी लागला आहे. 24 सप्टेंबर 2021रोजी सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा गाठला होता. जाणून घेवूया सेन्सेक्सचा दहा हजारांनी वाढलेल्या टप्प्यांविषयी…
60,000 ते 70,000 पर्यंतच्या प्रवासाला 548 दिवस किंवा 1.5 वर्षांचा कालावधी लागला जो 30-स्टॉक एक्स्चेंजने 10,000 पॉइंट्सच्या पुढे जाण्यासाठी दुसरा सर्वात कमी आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा गाठला होता.
भारतात सेन्सेक्स 20 हजारांहून 30 हजारांवर जाण्याचा प्रवास हा सर्वात प्रदीर्घ ठरला आहे. 20 हजारांहून 30 हजारांचा टप्पा ओलांडण्यास सेन्सेक्सला 2,318 दिवस म्हणजे सुमारे 6.35 वर्षांचा कालावधी लागला. 26 एप्रिल 2017 रोजी सेक्सेक्स 30,000 चा टप्पा गाठला.
सेन्सेक्सने 30 हजारांहून 40 हजारांचा टप्पा हा सर्वात कमी म्हणजे केवळ 520 दिवसांमध्येच पूर्ण केला होता. 3 जून 2019 रोजी सेन्सेक्सने हा टप्पा गाठला. त्या दिवशी सेन्सेक्स 40,267.62 वर स्थिरावला होता.
7 फेब्रुवारी 2006 रोजी सेन्सेक्सच्या 10,000 ते 11 डिसेंबर 2007 रोजी 20,000 पर्यंतच्या प्रवासाला 463 दिवस म्हणजे सुमारे 1.3 वर्षे लागली, तर 40,000 ते 50,000 पर्यंतचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 416 दिवस म्हणजे 1.14 वर्षे लागली. 3 फेब्रुवारी 2021 रोजी सेन्सेक्स 50 हजारांचा आकडा पार केला होता.
50,000 ते 60,000 पर्यंत सर्वात वेगवान 10,000 अंकांची वाढ होती. यासाठी केवळ 158 दिवस लागले. 24 सप्टेंबर 2021 रोजी सेक्सेक्स 60,048.47 वर स्थिरावला होता.