Closing Bell : सुरुवात चांगली; पण पुन्‍हा ‘घसरगुंडी’!, आज शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Closing Bell : सुरुवात चांगली; पण पुन्‍हा ‘घसरगुंडी’!, आज शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  शेअर बाजारात आज ( दि. २५) व्‍यवहाराला सकारात्मक सुरुवात झाली; पण सुरुवातीच्या तेजीनंतर विक्रीचा बोलबाला राहिल्‍याने बाजाराने पुन्‍हा एकदा घसरण अनुभवली. आज सेन्‍सेक्‍स 522.82 अंकांच्‍या घसरणीमुळे 64,049.06 वर तर निफ्‍टी 159.60 अंकांच्‍या घसरणीसह 19,122.15 वर बंद झाला. याआधी सोमवारी भारतीय बाजारात सलग चौथ्या दिवशी विक्रीची सपाटा कायम राहिला होता. BSE सेन्सेक्स 825 अंकांनी घसरून 64,571 वर बंद झाला होता.

चार दिवसांनी व्‍यवहारांना सकारात्‍मक प्रारंभ, पण…

जागतिक बाजारापेठेतील सदृढ स्‍थितीचे सकारात्‍मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसले. व्‍यवहाराच्‍या प्रारंभी प्रमुख निर्देशांकांनी सकारात्‍मक सुरु केली. त्‍यामुळे केली चार दिवस सुरु असलेल्‍या घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्स 145.05 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 64,712.90च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 41.00 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 19322.75 च्या पातळीवर व्यवहार करत होता..प्रारंभीच्‍या व्‍यवहारात धातू आणि बँकिंग क्षेत्राच्‍या शेअर्संनी तेजी अनुभवली. हिंदाल्को आणि टाटा स्टील हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले. सकाळी शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली; पण सुरुवातीच्या तेजीनंतर विक्रीचा बोलबाला राहिला आ‍णि बाजाराने पुन्‍हा एकदा घसरण अनुभवली.

विशेष म्‍हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा नफा आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही बाजार घसरला.  निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रत्येकी 1% पेक्षा जास्त घसरले. दरम्यान, निफ्टी रियल्टी आणि मीडिया देखील अनुक्रमे 2.1% आणि 2.9% घसरले.

घसरण कायम राहण्‍यामागे 'या' बाबी ठरल्‍या कारणीभूत

अर्थतज्‍ज्ञांच्या मते आंतराष्‍ट्रीय बाजारात घसरणी भारतीय बाजाराचा मोठा परिणाम जाणवला. इस्‍त्रायल आणि हमास युद्धाचा अमेरिकेच्‍या बाजारावर नकारात्मक  परिणाम जाणवत आहे. युरोपचा स्टॉक बेंचमार्क देखील कमकुवतच राहिला आहे. मोठ्या ग्राहकांना तोंड देणार्‍या कंपन्यांच्या कमाईने कॉर्पोरेट नफ्यावर परिणाम होत असल्याची चिंता निर्माण केली आहे. त्‍याचबरोबर देशातंर्गत आयटी आणि वाहन शेअर्स मोठी घसरण अनुभवत आहेत. आयटी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्संनी बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. याचा  थेट परिणाम बाजारावर झाला आहे.

'हे' शेअर्स वधारले

हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, JSW स्टील, कोल इंडिया,डॉ. रेडिज लॅबोरेटरीज, कोटक महिंद्रा बँक. एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि  ॲक्सिस बँकेचे शेअर्स वधारले.

'या' शेअर्संनी अनुभवली घसरण

इन्फोसिस, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टायटनचे समभाग घसरले. निफ्टीमध्ये एनटीपीसीचे शेअर्सने घसरण अनुभवली.

कच्‍च्‍या तेलाच्‍या किमती सलग चौथ्‍या दिवशी घट

कच्च्या तेलाच्या किमती सलग चौथ्या दिवशी घसरल्या आहेत. मागील दोन दिवसांमध्‍ये कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमतीमध्‍ये ४ टक्‍के घसरण झाली आहे. कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमत आता प्रति बॅरल ( पिंप) 88 डॉलरवर पोहोचली आहे. WTI ची किंमत $84 च्या खाली घसरली. कच्च्या तेलाच्या किमतीतील ही घसरण जर्मनी आणि युरोपमधील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे ऊर्जेची मागणी कमी होण्याच्या भीती व्‍यक्‍त होत आहे.

सलग चार दिवस बाजाराने अनुभवली होती घसरण

सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 825.74 अंकांच्या किंवा 1.26 टक्क्यांच्या घसरणीसह 64571.88 वर बंद झाला आणि निफ्टी 260.90 अंकांच्या किंवा 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह 19281.80 वर बंद झाला होता. सुमारे 497 शेअर्स वाढले होते. त्याच वेळी, 2893 समभाग घसरले आहेत. तर 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नव्‍हता.

आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवसाय पहायला मिळले . चीनचा शांघाय कंपोझिट, जपानचा निक्केई आणि हाँगकाँगचा हँग सेंग मार्केटने तेजी अनुभवली तर दक्षिण कोरियाचा कोस्पी तोट्यात राहिला.जागतिक बाजारातील सदृढ स्‍थिती, अमेरिकन बाजारातील उत्‍साह, कच्‍च्‍या तेलांमध्‍ये झालेली घट याचे सकारात्‍मक परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावर सुरुवातीला दिसले. मात्र विक्रीचा जोर कायम राहिल्‍याने बाजार बंद होताना गुंतवणूकदारांच्‍या पदरी आज ( दि.२५) पुन्‍हा एकदा निराशा पडली.

हेही ‍‍वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news