वेध शेअर बाजाराचा : शेअर बाजार पडझडीतून सावरण्याच्या दिशेने… | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : शेअर बाजार पडझडीतून सावरण्याच्या दिशेने...

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

गुरुवार, दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी monthly Expiry पार पडली. साप्ताहिक पातळीवर विचार केला तर निफ्टी 50, निफ्टी बँक आणि सेन्सेक्स Negative झोनमध्ये बंद झाले. परंतु पूर्ण महिन्याचा विचार करता, सप्टेंबरमध्ये निफ्टी पावणे दोन टक्क्यांनी तर सेन्सेक्स सव्वा टक्क्यांनी वाढला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण महिनाभर चढ-उतार होऊन अखेरीस बँक निफ्टी सपाट राहिला.

निफ्टी 50 – 19668.30
सेन्सेक्स – 65828.41
निफ्टी बँक – 44584.55

शुक्रवार, दि. 29 सप्टेंबरच्या तेजीने मार्केटने निफ्टीला 19500 च्या खाली जाऊ दिले नाही, ही निश्चितच आशादायक बाब आहे.
मागील दोन लेखांत म्हटल्याप्रमाणे Nifty PSU Bank  हा निर्देशांक अजूनही स्टार परफॉर्मरच्या भूमिकेत आहे. सप्टेंबरमध्ये तो 15 टक्क्यांहून अधिक वाढेल. मॉर्गन स्टॅन्लेने त्यांच्या इंडेक्समध्ये भारत सरकारच्या बाँडस्चा सरकारी बँकांनी सर्व अनुषांवर, आपली आर्थिक कामगिरी कमालीची सुधारल्यामुळेच मार्गन स्टॅन्लेने हा समावेश केला.

HUDCO Housing urban and Development Corporation हा शेअर सप्टेंबर महिन्यात 22 टक्क्यांहून अधिक वाढला. मागील सहा महिन्यांत तो दुप्पटीहून अधिक वाढला आहे. हाऊसिंग फायनान्स आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये कर्ज पुरवठा करणारी ही सरकारी कंपनी आहे. जागतिक बँकेसहित अन् आंतरराष्ट्रीय संस्थांचे अहवाल पाहता, भारतामधील शहरी करणाचा वेग अधिक आहे आणि त्यामुळे हाऊसिंग फायनान्स आणि अर्बन इन्फ्रा सेक्टरला उज्ज्वल भवितव्य आहे. शिवाय भारत सरकारनेही या सेक्टरला चालना मिळण्यासाठी अनेक धोरणे अंगीकारली आहेत. हडकोच्या तेजीमागचे कारण हे आहे. याच क्षेत्रातील इतर कंपन्यांची गेल्या सहा महिन्यांतील कामगिरी पाहा.

मागील आठवड्यात 12 टक्के वाढून चर्चेत आलेला आणखी एक शेअर म्हणजे Tata Investment Corporation Ltd!  सप्टेंबर महिन्यात हा शेअर 35 टक्के, तर गेल्या सहा महिन्यांत 88 टक्के वाढला आहे. सध्याचा भाव रु. 3280 टाटा ग्रुपची ही Investment Company  आहे आणि ती लिस्टेड शेअर्स, अनलिस्टेड शेअर्स डेट इन्स्ट्रूमेंटस्, म्युच्युअल फंडस यामध्ये गुंतवणूक करते. कंपनीची बूक व्हेल्यू रु. 3868 म्हणजे शेअरच्या किमतीपेक्षा अधिक आहे. पूर्णतः कर्जमुक्त असणार्‍या या कंपनीचा Dividend Payout शंभर टक्के आहे.

शेअर मार्केटमध्ये Short term trading चौफर असावे लागते. Accenture  या अमेरिकेतील IT Services कंपनीने आपले QG चे आर्थिक निकाल मागील सप्ताहात जाहीर केले. अमेरिकेतील आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असे असते.

Accenture चे निकाल तेथील बाजार तज्ज्ञांच्या अंदाजांपेक्षा खूपच निराशादायक होते. शिवाय कंपनीच्या प्रवर्तकांचा पुढील वर्षाचा व्यवसाय अंदाजही उत्साहवर्धक नव्हता. त्यामुळे भारतातील IT कंपन्यांचे शेअर्स गतसप्ताहात साडेतीन टक्क्यांनी घसरले. Wipro Infosys, Mphasis HCL Teach, Teach Mahindra कंपन्यांचे शेअर्स जवळपास पाच टक्क्यांनी घसरले.

शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर आपण गुंतवणूक केलेल्या कंपन्यांच्या कामगिरीकडे सतत लक्ष दिले पाहिजे. याचा एक मार्ग म्हणजे रोज मार्केटमध्ये होणार्‍या Block Deals चा अभ्यास करणे. Block Deals म्हणजे एकाच कंपनीच्या किमान 5 लाख शेअर्सचा अथवा रु. 5 कोटी किमतीच्या शेअर्सचा व्यवहार होणे. या Block Deals चा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचे? तर एखाद्या शेअरमध्ये Block Deals झाले आणि ते शेअर्स अन्य गुंतवणूकदार संस्थांनी FII, DII, Ace Investors खरेदी केले, तर तो शेअर चांगला आहे, असे मानले जाते. मात्र ते अन्य कुणी संस्थांनी न घेता रिटेल इन्व्हेस्टर्सनी खरेदी केले तर प्रसंग काळजी करण्यासारखा असतो.
असेच एक मोठे Block Deal Restaurants Brands Asia Ltd (पूर्वीची Burger King) या शेअर्समध्ये झाले. त्याविषयी अधिक माहिती पुढील लेखात!

Back to top button