न्यू इनोव्हेशन फंडस् | पुढारी

न्यू इनोव्हेशन फंडस्

अनिल पाटील

पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक केल्यास आपली गुंतवणूक वाढणार नाही. त्यासाठी आपल्या गुंतवणुकीत जागरूकता आणली पाहिजे. नुकतेच म्युच्युअल फंडातील नवीन इनोव्हेशन फंडस्, न्यू फंड ऑफर आले आहेत. अशा योजनांचा अभ्यास करून जोखीम समजावून घेऊन केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

गुंतवणुकीला मोठी संधी म्हणून इतर देशाचे लक्ष भारताकडे वेधले जात आहे. कोविड काळात मोठी मंदी निर्माण झाल. नंतर युक्रेन-रशिया युद्धामुळे अनेक देशात महागाई वाढलेली आहे. त्यावर मात करण्यासाठी या देशांनी व्याज दर वाढविले. वाढलेली महागाई आणि बँकाचे व्याज दर यामुळे जगात अशांतता आणि मंदीचे वातावरणात निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती वेगाने चालू आहे. आपल्या देशातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत 45% वाढ झाली आहे. लोह खनिजे निर्यातीत 35%, कृषी निर्यातीत मसाले, फळे, भाज्या,तेलबियामध्ये 20% अधिक वाढ झाली आहे . 22-23 मध्ये 447 अब्ज डॉलर इतकी निर्यात झाली आहे.

आयात-निर्यातमधील फरक म्हणजे व्यापारी तूट जून 2022 मध्ये 31.49 अब्ज डॉलर होती. ती जून 23 मध्ये 22.59 अब्ज डॉलर इतकी कमी झाली आहे. देशाची 2030 पर्यंत 777 अब्ज डॉलर निर्यात होईल असे मत स्टॅण्डर्ड चार्टने व्यक्त केले आहे. 2021-22 मध्ये एफडीआयने जवळपास णड 85 अब्ज एवढी गुंतवणूक करून नवीन उच्चांक केला आहे. 2023 मध्ये ही गुंतवणूक 16% वाढलेली आहे. यावरून विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात देशाने विश्वास प्राप्त केल्याचे दिसते.

देशात नवनवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. तंत्रज्ञानातील नवनवीन बदलामुळे अनेक पारंपरिक व्यवसाय तोट्यात किंवा बंद पडताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत. उत्पादन क्षेत्रातील खर्चात बचत करणे, व्यवसायातील खर्चात बचत करणे, वाहतूक व्यवसायात बदल करणे, व्यवसायाचे ब्रँडिंग, ग्राहकाना आकर्षित करणे, जागृती निर्माण करणे अशा आव्हानात्मक गोष्टी नवीन तंत्रज्ञानामुळे सुलभ झाल्या आहेत. डीकार्बनायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कॉम्पिटिंग, बायोटेक्नोलॉजी, बायो सर्व्हिसेस, ई कॉमर्स,बायो इंडस्ट्री, सायबर सेक्युरिटी, मेटावर्स ब्लॉकचेन, क्रीफ्टो करन्सी, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रियल्टी, थ्रीडी टेक्नालाजी, आटोमेशनसारख्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक व्यवसायात आमूलाग्र बदल होत आहेत. एक काळ असा होता की लोक सोने घेऊन प्रवास करत होते, नंतर पैसे घेऊन प्रवास करू लागले. नंतर डेबिट कार्ड घेऊन प्रवास करू लागले. आता मोबाईल वर काम होते. यूपीआयच्या ऑनलाईन पेमेंटमुळे लोकांना बँकेत जाण्याची गरज भासत नाही. घरात, खिशातही पैसेही ठेवायची गरज भासत नाही.

पूर्वी फोटो काढण्यासाठी कॅमेरा लागत होता आता ती जागा मोबाईलने घेतली आहे. मोठ्या टीव्हीच्या बॉक्स ठिकाणी नवीन स्मार्ट टीव्ही आले. असे अनेक ठिकाणी बदल झालेले पहावयास मिळत आहेत. अ‍ॅग्रीकल्चर, बायो अ‍ॅग्रीकल्चर, एफएमसीजी, उत्पादन क्षेत्र, न्यू ग्रीन एनर्जी, बँकिंग फायनान्स, डिफेन्स, सोशल मीडिया, सर्व्हिस सेक्टरमध्ये खूपच नवनवीन संशोधनात्मक बदल घडले आहेत.

टेलिकॉम सेक्टरमध्ये खूप बदल झाले आहेत. देशात आज 62 कोटी लोक इंटरनेट वापरत आहेत. 5-जी मुळे खूप मोठा बदल होणार आहे. इंटरनेट वापरामुळे ई कॉमर्स, फिन्टेक, डिजिटल मीडिया, डाटा सेंटर, ई लॉजिस्टिकसारखे उद्योगांना चालना मिळणार आहे. 2035 पर्यंत या क्षेत्रात 12 ट्रिलियन गुंतवणूक होणार आहे. आटो सेक्टरमध्ये सरकारचा इंधनावर मोठा पैसा खर्च होतो. त्यावर पर्याय म्हणून बायो डिझेल, ग्रीन एनर्जी इथेनॉल, हायड्रोजन उत्पादन या गोष्टीवर सरकार भर देत आहे. हायड्रोजनवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती व इलेक्ट्रोनिक व्हेईकल उत्पादन करण्यावर सरकार भर देत आहे.

2022 मध्ये 10लाख इव्ही गाड्यांची विक्री झाली. हा खप म्हणजे आज जगाच्या तुलनेत भारतात अर्धा टक्का मार्केट ई-व्हेईकलचे आहे. 2030 पर्यंत 70% पर्यंत नेण्याचा सरकारचा मनोदय आहे. अशा या क्षेत्रात नवनवीन कंपन्यांना भरपूर वाव दिसून येतो आहे. रोबोटिक वापर उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात ऑनलाईन शस्त्रक्रिया होत आहेत. जेनेरिक वैद्यकीय क्षेत्रात भारताचा तिसरा क्रमांक लागत आहे. 42 अब्ज डॉलरची निर्यात यावर्षी झाली आहे, 2030 पर्यंत ती 120 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. अवकाश क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया अंतर्गत मागील वर्षी 75 हजार कोटी गुंतवणूक झाली आहे.

नवीन उपकरणे निर्मिती मोठ्या प्रमाणत होत असून, यावर्षी 11 अब्ज डॉलर उत्पादन झाले आहे आणि 2025 पर्यंत 25 अब्ज डॉलरचे लक्ष ठेवण्यात आहे. सन 2022 मध्ये प्रथमच 16000 कोटी निर्यात या क्षेत्राने केली आहे. ड्रोनद्वारे शत्रूवर नियंत्रण करण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

जी कंपनी स्वतःमध्ये बदल करू शकत नाही ती कालबाह्य ठरणार आहे. नवीन बदलत्या मार्केटच्या ट्रेंडनुसार आपली गुंतवणूक पद्धत बदलायला हवी. जिथे ग्रोथ मिळणार आहे त्या प्रवाहात गुंतवणूक केली पाहिजे. पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक केल्यास आपली गुंतवणूक वाढणार नाही. त्यासाठी आपल्या गुंतवणुकीत जागरूकता आणली पाहिजे. नुकतेच म्युच्युअल फंडातील नवीन इनोव्हेशन फंडस्, न्यू फंड ऑफर (छऋज) आले आहेत. अशा योजनांचा अभ्यास करून जोखीम समजावून घेऊन केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाने काही दिवसांपूर्वी ही योजना सुरू केली आहे. निप्पोन इंडिया आणि युनियन म्युच्युअल फंडातील यूएफओ आले आहेत.

देशाची प्रगती होत असताना लोकांची राहणीमानाचा दर्जा उंचावतो. त्यासाठी नवनवीन संकल्पना उदयास येत असतात. त्यास अनुसरून पुढील 20 वर्षांमध्ये भारतात नावीन्य आणि संशोधन आणि विकास (संशोधन आणि विकास) मध्ये लक्षणीय गुंतवणूक वाढणार आहे. व्यवसायात नवकल्पनाद्वारे नवीन उत्पादन करणार्‍या कंपन्या शोध घेऊन अशा कंपन्यामध्ये 80% पर्यंत गुंतवणूक करू शकतात. क्वालिटी कंपन्याची व्यवसाय निवड केली जाणार आहे. ही योजना डायव्हरसी फाईड इक्विटी योजना आहे. फ्लेक्जी कॅप या कॅटेगिरी मध्ये या योजनेचा समावेश होतो.

लार्ज कॅप मिड कॅप आणि स्माल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यांना दहा वर्षांहून अधिक काळासाठी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यांना खूपच फायदेशीर ठरणार आहे. या योजनेतील गुंतवणूक बाजारातील जोखीम युक्त आहे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे तपशील काळजीपूर्वक वाचावे मगच गुंतवणूक करावी.
(लेखक एस. पी. वेल्थचे प्रवर्तक आहेत.)

Back to top button