सार्वकालीन उच्चांकाच्या दिशेने निफ्टी | पुढारी

सार्वकालीन उच्चांकाच्या दिशेने निफ्टी

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफीट अँड वेल्थ प्रा.लि.

शुक्रवार, दि. 16 जून 2023 रोजी निफ्टी 50 18000 च्या वर बंद झाला आणि निफ्टीचा सार्वकालीन उच्चांक 18887.50 बाजाराला खुणावू लागला. निफ्टी 50 प्रमाणेच निफ्टी 500 (1618.45), निफ्टी बँक (43938.15) हे निर्देशांक ही नवीन उच्चांक करण्याच्या तयारीत आहेत, तर निफ्टी स्मॉल कॅप 100 (10740.50) आणि निफ्टी मिड कॅप 100 (35144.30) यांनी अगोदरच बाजी मारून नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत. सेक्टरल इंडायसेसपैकी निफ्टी इन्फ्रा, निफ्टी एमएनसी, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी पीएसई, निफ्टी कंझंप्शन हे निर्देशांकही विजेत्यांच्या यादीत आहेत. निफ्टी रिअ‍ॅल्टी, निफ्टी ऑटो हे शर्यत जिंकण्यास सज्ज आहेत. मात्र, निफ्टी मेटल, निफ्टी एनर्जी आणि निफ्टी आयटी हे निर्देशांक पिछाडीवर आहेत.

तेजीला अनेक घटना कारणीभूत ठरतात. त्यापैकीच एक घटना या सप्ताहात सोमवारी घडली. ती म्हणजे IIP (India’s Index of Industrial Production) चा आकडा जाहीर झाला. IIP हा निर्देशांक mineral mining, electricity आणि manufacturing या सेक्टर्समधील वाढ किंवा घट मोजतो. हा आकडा वाढत असेल तर देशाचे औद्योगिक क्षेत्र प्रगतिपथावर आहे, असे समजले जाते. दरमहा हे आकडे प्रसिद्ध केले जातात. सोमवारी एप्रिल महिन्याचे आकडे प्रसिद्ध झाले. मार्च 2023 मध्ये IIP चा आकडा 1.1 टक्के होता, तो एप्रिलमध्ये वाढून 4.2 टक्के झाला.

CPI (India Consumer Price Index) आणि थझख WPI (Wholesale Price Index) चे आकडेही सोमवारी प्रसिद्ध झाले. हे निर्देशांक अनुक्रमे ग्राहक खरेदी आधारित महागाई आणि घाऊक महागाई यांचे मोजमाप करतात. ते वाढत असतील तर महागाई दर वाढत आहे आणि कमी होत असतील तर महागाई दर कमी होत आहे, असे मानले जाते. 12 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मे 2023 मध्ये CPI 4.25 टक्के होता. हाच आकडा बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे मे 2022 मध्ये 7.04% होता. त्याचप्रमाणे WPI मे 2023 मध्ये उणे 3.48% होता. तो तर नोव्हेंबर 2015 पासून म्हणजे मागील साडेसात वर्षांच्या कालावधीतील नीचांक आहे.

महागाई दर कमी होणे हा शेअर बाजारातील तेजीच्या द़ृष्टीने Trigger Point असतो. कमी होणारा महागाई दर दोन प्रकारे तेजीला साहाय्यभूत ठरतो. एक तर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी केले जातात. व्याजदर कमी झाले की, कॉर्पोरट कंपन्यांकडून कर्जांची उचल होऊन त्यांचा क्षमताविस्तार केला जातो. शिवाय त्यांना व्याज कमी भरावे लागल्यामुळे नफाही वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे महागाई कमी झाल्यामुळे लोकांकडून खरेदी वाढते. खरेदी जसजशी वाढेल तसतसे कंपन्यांकडून उत्पादन वाढवले जाते. नोकरवर्गाला व कामगार वर्गाला वेतन वाढ मिळते आणि हळूहळू बाजारातील मंदीचे सावट दूर होऊ लागते.

BCG हा शेअर 33.26 टक्क्यांनी वाढून या आठवड्याचा स्टार परफॉर्मर ठरला. मागील एक महिन्यात हा शेअर 100 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. असे काय आहे या शेअरमध्ये? त्यावर कधीतरी सविस्तर लिहायला हवे. Tanla, Mazgaon Dock, Kalyan Jewellers Olectra, Heg, Paytm, Karur Vysya Bank हे शेअर्सही 15 टक्क्यांहून अधिक वाढले. महाराष्ट्र बँक, IEX हे शेअर्स गडगडले. IEX ची घसरगुंडी काही थांबायचे नाव घेत नाही.

Slow Down किंवा मंदीच्या सावटातून बाहेर पडून कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जेव्हा तेजीच्या दिशेने वाटचाल करू लागते, तेव्हा त्या देशातील Consumption वाढते. किंबहुना Consumption वाढल्यामुळेच बाजारात तेजी येते. अशा Consumption शेअर्सचे प्रतिनिधित्व करणारा एनएसईचा एक निर्देशांक आहे. Nifty Consumption Index! Consumption या संकल्पनेशी निगडित विविध सेक्टरमधील 30 कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. इथून पुढे नजीकच्या काळात या कंपन्यांचा व्यवहार खूप वाढेल, असे संकेत आहेत.

केंद्र सरकारने घरोघरी गॅस पुरवठा होण्यासाठी गॅस वितरण व्यवस्था मजबूत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. या गॅसचे वितरण करण्यासाठी लागणारी पाईप-लाइन व्यवस्था उभारणे आणि तिची निगा राखणे या क्षेत्रात प्रभुत्व असणारी एक कंपनी आहे. Likhita Infra संपूर्णपणे Debt free असणार्‍या या कंपनीची आर्थिक कामगिरी नजरेत भरण्यासारखी आहे. तीन वर्षांची सरासरी विक्री 30 टक्के, नफा वृद्धी 44%, तर Return on equity 27 टक्के आहे. कंपनीची मजबूत कामगिरी आणि सरकारचे गॅस वितरण वाढवण्याचे धोरण पाहता, इथून पुढेही हा शेअर दमदार कामगिरी करेल, असे वाटते. शुक्रवारचा बंदभाव होता. 259.55 आणि पीई आहे 17 टक्के! विचार करायला हरकत नाही.

 

Back to top button