

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर मार्केटमध्ये आज आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली. आजच्या व्यवहाराच्या सेन्सेक्सची सुरुवात ३०० अंकांच्या तेजीने झाली. शुक्रवारी तो ६२, ५०१ पातळीवर बंद झाला होता. NSE व्यवहार सुरु झाल्यानंतर व्यापारात प्रमुख शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६३,००० च्या पातळीवर पोहोचला. मात्र आजचे व्यवहार बंद होताना निफ्टी ४० अंकांहून अधिक घसरत १८,५९९ स्थिर झाला. तर सेन्सेक्सने ६३,००० ची ओलांडल्यानंतर अल्प घसरण अनुभवत ६२,८३४ वर स्थिरावला. एकुण आज संपूर्ण दिवस बाजाराने ग्रीन सिग्नल अनुभवला.
बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी ५०७.२२ अंकांनी वाढून ६३,००८.९१ च्या पातळीवर पोहोचला हाेता. निफ्टी १४१.८५ अंकांनी वाढून १८,६४१.२० वर पोहोचला होता. दरम्यान, रुपया सात पैशांनी वधारला आणि ८२.५३ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
निफ्टी १८,६१९.१५ अंकांवर उघडला तर ४०० अंक वधारत सेन्सेक्सने ६३,००० ची पातळी ओलांडली. बँक निफ्टीने सोमवारी प्रथमच४४,४५० चा टप्पा ओलांडत ४४,४८३.३ चा विक्रमी उच्चांक गाठला.
आज ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मेटल, रियल्टी, एनर्जी, इन्फ्रा, एफएमजीसी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजीचा कल दिसून आला. महिंद्रा अँड महिंद्रा, HDFC, IndusInd बँक, बजाज फिनसर्व्ह, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, टायटन, UltrajTech आणि फिनसर्जच्या शेअर्सनी तेजी अनुभवली.
ओएनजीसी, एचसीएल टेक, पॉवर ग्रीड आणि मारुती कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली.