वेध शेअर बाजाराचा; बाजारात तेजीची चाहूल | पुढारी

वेध शेअर बाजाराचा; बाजारात तेजीची चाहूल

  • भरत साळोखे
    संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

सलग नऊ दिवस जेव्हा बाजार ग्रीन झोनमध्ये बंद होतात, तेव्हा बाजाराला तेजीची चाहूल लागलेली आहे असे म्हणावयास हरकत नाही. शुक्रवार, दिनांक 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीची सुट्टी असल्यामुळे गुरुवार, दिनांक 13 रोजी weekly Expiry होती. त्यावेळी प्रमुख निर्देशांकांची स्थिती खालीलप्रमाणे होती.

निफ्टी 50 – 17828 ला बंद.
सेन्सेक्स – 60431 ला बंद.
निफ्टी बँक – 42132.55 ला बंद.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हळूहळू का होईना; पण खरेदीचा ओघ सुरू ठेवला आहे. गत सप्ताहात FIIS नी 3355.16 करोड रुपयांची निव्वळ खरेदी भारतीय बाजारात केली. बाजाराला तेजीची चाहूल लागली आहे. असे म्हणण्याला ही खरेदी हे एक कारण आहे. आणखी दुसरे एक कारण म्हणजे भारतातील म्युच्युअल फंडाच्या Bal – anced Advantage योजनांनी इक्विटीमध्ये त्यांचा निधी वळविण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारच्या योजना Dyamic Asset Allocation करतात.  म्हणजे बाजार  Higher velutions  वर ट्रेड करत असेल, तर इक्विटीमध्ये गुंतवणूक कमी करतात व डेट साधनांमध्ये वाढवतात. उलट बाजार Lower Valuations वर ट्रेड करत असेल, तर डेट साधनांमधील गुंतवणूक कमी करून इक्विटीमधील वाढवतात.

सोमवारी गोदरेज प्रॉपर्टीजने आपले विक्रीचे आकडे जाहीर केले. QoQ बेसिसवर ( Quarter Over Quarter – दर तिमाहीमागे) कंपनीच्या विक्रीमध्ये 19 टक्के वाढ झाली, तर धेध बेसिसवर 40 टक्के वाढ झाली. त्यामुळे गोदरेज प्रॉपर्टीचा शेअर 9.82 टक्के वाढला. प्रेस्टिज इस्टेट आणि डीएलएफ हे शेअर्सही अनुक्रमे 6.81 टक्के आणि 5.69 टक्के वाढल्यामुळे निफ्टी रिअल्टी इंडेक्स 4.29 टक्क्यांनी वाढला. अगोदर गृहनिर्माण प्रकल्पांच्या प्रोजेक्टसनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय RBI  इथून पुढे व्याज दरवाढ करण्याची शक्यता मंदावत चालली असल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला इथून पुढेही चांगले दिवस येतील. रिअ‍ॅल्टी शेअर्सनी चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल चांगले दिले तर हे शेअर्स खूपच वधारतील.

सोमवारी भारतीय शेअर बाजार रियल इस्टेट कंपन्यांनी गाजवला असतानाच मंगळवारी NSE Indice Ltd. ( National Stock EX – Change  ची उपकंपनीने भारतातील पहिला Real Estate investment Trusts and  Infrastucture Investment Trusts Index- Nifty REITs and InVITs Index  सुरू केला.

REIT  म्हणजे Real Estace Investment Trust आणि Higher Valuations हे ट्रस्ट म्हणजे Real Estate आणि Infrastructure
कंपन्यांमध्ये किंवा त्यांच्या Projects मध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंडस् म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सविस्तर माहितीसाठी आपण कधीतरी एक प्रदीर्घ लेख अभ्यासू.

आयटी जायंट टीसएसने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. करोत्तर नफ्यात 15 टक्के वाढ आणि उत्पन्नात 17 टक्के वाढ कंपनीने दर्शवली आणि रु. 24 अंतिम लाभांशही जाहीर केला. परंतु गुंतवणूकदारांची मानसिकता ‘ये दिल माँगे मोर’अशी होती. त्यामुळे शेअर दीड टक्क्यांहून अधिक घसरला.

Value Investing मधेच फंडामेंटल अ‍ॅनालिसीसला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामध्ये कंपनीचे व्यवस्थापन हा भाग मुख्य असतो. कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, ते कधी बदलते यावर शेअरचे भाव खाली-वर कसे होतात, याची प्रचिती गत सप्ताहात  AU Small Finance बँंकेच्या शेअरने आणून दिली. बँकेचे एम. डी. आणि सी.ई.ओ. संजय आगरवाल यांच्या तीन वर्षांच्या मुदतवाढीला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आणि हा शेअर त्या दिवशी 16 टक्के वधारला.

पुढील आठवड्यात बहुतेक सरकारी बँकांचे वित्तीय निकाल जाहीर होतील. निव्वळ नफ्यात वाढ, व्यवसायात वाढ, एनपीएमध्ये घट, प्रोव्हिजन्समध्ये घट. अशा सर्वच पातळ्यांवर निकाल लक्षणीयरीत्या चांगले येण्याचे अंदाज बहुतेक तज्ज्ञांनी वर्तवलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर युको बँक, सेंट्रल बँक, कॅनरा बँक आदी सरकारी बँकांनी Postitive Breakouts दिलेले आहेत. एचडीएफसी बँकही आपले निकाल जाहीर करेल. निफ्टी बँक धमाल करण्याची चिन्हे आहेत.

आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स हे शेअर्स दमदार कामगिरी करतील.
Redington Ltd ही Information technology, mobility, telecom, cloud, Lifestyle आणि Solar इत्यादी सेक्टर्सना IT Sotutions  पुरवणारी कंपनी आहे. 38 देशांमध्ये तिचा विस्तार आहे.  रु. 202 हा 52 Week High असणारा शेअर आज रु. 175 ला मिळतो आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने विक्रीत वाढ, निव्वळ नफ्यात वाढ दर्शवणारी ही कंपनी आहे. कंपनीचे फंडामेंटल्स पाहता हा शेअर रु. 200 च्या वर गेला तर बरीच वरची मजल गाठेल, असा विश्वास वाटतो.

Back to top button