यावेळचा चकाकता हिरा म्हणून 'लार्सेन अँड टूब्रो' या ब्रोकरची निवड केली आहे. सध्या बाजारात जरी उदासीनता असली तरी लार्सेन अँड टूब्रो, लॉर्सन मेंड टूब्रो इन्फोटेक, स्टेट बँक ऑफ इंडिया हे नेहमीच चकाकते हिरे असतात. त्यामुळे दरवेळेला नवीन शेअर हुडकला पाहिजे याची जरूरी नसते म्हणून पुन्हा एकदा या शेअरला कम बँकची ऑफर दिली आहे.
सध्या या शेअरचा भाव 2160 रुपये आहे. वर्षात याचा भाव 2750 रुपयांच्या आसपास जावा. लार्सेन अँड टूब्रो ही कंपनी एल अँड टी म्हणून सर्वपरिचित आहे. अनेक कंपन्या हिच्यात सामावलेल्या असून, ती इंडियन मल्टीनॅशनल कंपनी आहे. इंजिनिअरिंग आणि फिनान्शिअल सर्व्हिसेस इत्यादी क्षेत्रांत ती कार्यरत आहे. हिचे मुख्य कार्यालय मुंबई इथे आहे.
सध्या शेअर बाजार जरी दोलायमान असला तरी हा शेअर कायम चकाकताच राहणार आहे. विमानतळ, मेट्रो, महामार्ग यांसारख्या मोठमोठ्या प्रॉजेक्टस्मध्ये ही कंपनी प्रामुख्याने कार्यरत आहे. हा शेअर सदैव मोठ्या प्रमाणात आपल्या भागभांडवलात हवा.