Stock Market Opening | सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला, जाणून घ्या कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला, जाणून घ्या कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले

Stock Market Opening : जागतिक संकेत संमिश्र आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज (दि.९) घसरण पहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २५० अंकांनी घसरून ६०,१०० वर होता. तर निफ्टी १७,६८२ वर आला. सेन्सेक्सवर टाटा स्टील, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक हे शेअर्स ०.५ ते १.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट हेदेखील तेजीत आहेत.

तर रिलायन्स, एम अँड एम, टीसीएस, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक हे शेअर्स घसरले आहेत. निफ्टी मेटल १.४४ टक्के वाढला आहे. निफ्टी फार्माही वधारला आहे. पण निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो हे खाली आले आहेत.

अमेरिका, आशियात संमिश्र व्यवहार

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने त्यांच्या अहवालात वाढती महागाई कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे आर्थिक मंदीची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.२ टक्के घसरून ३२,७९८ वर बंद झाला. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक ०.४ टक्के वाढून ११,५७६ वर स्थिरावला. आशियाई बाजारातही आज संमिश्र परिस्थिती आहे. चीनचा शांघाय कंपोझिट घसरला असून हाँककाँगचा हेंग सेंग निर्देशांक वाढला आहे. कोरियाचा कोस्पी खाली आला असून जपानचा निक्केई निर्देशांक वधारला आहे. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button