Stock Market Today | सेन्सेक्स तेजीत, पण अदानींच्या शेअर्समधील घसरण कायम | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स तेजीत, पण अदानींच्या शेअर्समधील घसरण कायम

Stock Market Today : अमेरिका आणि आशियातील बाजारातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत आज शुक्रवारी (दि.३) भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली. सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून आज खुला झाला. तर निफ्टी १७,७०० वर खुला झाला होता. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ४१८ अंकांनी वाढून ६०,३५० वर होता. तर निफ्टीने १७,६८१ वर व्यवहार केला.

अदानींचे शेअर्स आजदेखील सुरुवातीच्या व्यवहारात १० टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १५ टक्क्यांनी घसरला आहे. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्स १० टक्क्यांनी खाली आले आहेत. अदानी पोर्टस्, अदानी विल्मर हे ५ टक्क्यांनी घसरले आहेत.

इंडसइंड बँक, टायटन, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, एम अँड एम, आयटीसी, इन्फोसिस टाटा मोटर्स, मारुती, टीसीएस, विप्रो, टाटा स्टील, रिलायन्स या शेअर्संनी सुरुवातीला हिरव्या रंगात व्यवहार केला. तर एचसीएल टेक, कोटक बँक, पॉवर ग्रिड आदी शेअर्स लाल रंगात गेले आहेत. (Stock Market Today)

 हे ही वाचा :

Back to top button