नववर्षाची दमदार सुरुवात, ‘सेन्सेक्स’ची ३२७ अंशांची कमाई | पुढारी

नववर्षाची दमदार सुरुवात, 'सेन्सेक्स'ची ३२७ अंशांची कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नवर्षांची सुरुवात शेअर बाजारात सकारात्‍मक सुरु झाली. पहिल्या  सत्रात बहुतांश प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांनी नफा नोंदविला. सेन्सेक्सने सकारात्मक सुरुवात करून अवघ्या तासाभरात 200 अंकांपर्यंत उडी घेतली. तर निफ्टी देखील 18,150 अंकांनी वर आला.  दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 3२७ अंशांची कमाई करत ६११६७ पातळीवर बंद झाला. तर ९२ अंकांनी वाढ होत राष्ट्रीय शेअर बाजाराचा ( निफ्‍टी ) निर्देशांक १८१९७ पातळीवर बंद झाला. एकुणच नववर्षाच्‍या पहिल्‍या दिवशी बाजारात सकारात्‍मक मानसिकता दिसून आली.

Stock Market Updates :  ‘हे’ शेअर्स वधारले

टाटा स्टीलचा समभाग निफ्टीमध्ये सर्वाधिक 5.73 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय हिंदाल्को, ओएनजीसी, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक वधारत बंद झाले. निफ्टीवर Divis Labs ने सर्वाधिक 1.27 टक्क्यांची घसरण नोंदवली. याशिवाय टायटन, एशियन पेंट्स, बजाज ऑटो आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअर्सनी घसरण अनुभवली.

नववर्षाची झाली होती सकारात्‍मक सुरुवात

पहिल्‍या सत्रात टाटा स्टील, हिंदाल्को टॉप परफॉर्म ठरले. मेटल इंडस्ट्री 3 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. डॉलरच्या तुलनेत रुपया अल्प मजबुतीने उघडला. काल डॉलरच्या तुलनेत रुपया 82.7200 वर बंद झाला होता. त्या तुलनेत आज रुपया 82.66 ने उघडला आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला .( Stock Market Updates )

चीनने ॲल्युमिनियमवर निर्यात शुल्क वाढल्‍याने भारतीय कंपन्‍यांना फायदा

देशांतर्गत मागणी सुधारण्यासाठी चीनने जानेवारी 1 पासून ॲल्युमिनियमवर निर्यात शुल्क वाढवण्याची योजना जाहीर केल्यानंतर धातूंचे भाव 1.5% पेक्षा जास्त वाढले, जे भारतीय कंपन्यांसाठी बाजार-शेअर वाढीस मदत करतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

आज बाजार उघडल्यानंतर अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, अशोका लेलँड, टाटा कम्यूनिकेशन्स यांच्यासह मेटल इंडस्ट्रीजने ग्रिप पकडली. तसेच मेटल कंपन्यांचे शेअर्स वधारले. मागील आठवड्यात कोरोनाच्या सावटमुळे औषध उत्पादन कंपन्या आणि मेडिकल इन्स्ट्रूमेंट कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला यामध्ये घसरण झाल्‍याचे दिसून आले. बाजार सुरू होण्यापूर्वी अर्थ विश्लेषकांनी नवीन वर्षासाठी अर्थव्यवस्था आणि बाजारातून संमिश्र संकेत आहेत, असे म्हटले होते. ( Stock Market Updates )अनेक कंपन्या 2023 मध्ये नियुक्ती कॅपेक्सबद्दल उत्साहित आहेत. हे भारतासाठी चांगले असून यामुळे बाजारात उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते. बँकिंग, भांडवली वस्तू आणि बांधकाम-संबंधित क्षेत्रातून बाजाराला धक्का देणारा परतावा मिळू शकतो, अर्थ विश्लेषकांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button