Share Market Today | जागतिक संकेत संमिश्र, सेन्सेक्स, निफ्टीची स्थिर सुरुवात

Share Market Today : कोरोनाची धास्ती आणि जागतिक बाजारातील संकेत संमिश्र राहिल्याने आज सोमवारी भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर खुले झाले. सेन्सेक्स किरकोळ वाढीसह ५९,९०० वर तर निफ्टी १७,८०० वर व्यवहार करत आहे.
अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी वाढला आहे. तर S&P ५०० यात देखील किरकोळ वाढ दिसून आली. नॅस्डॅक नॅस्डॅक कंपोझिट ०.२१ टक्क्यांनी वर गेला होता. आशियाई बाजारावर नजर टाकली तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वधारला. दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक स्थिर पातळीवर राहिले आहेत. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.४४ टक्क्यांनी खाली आला आहे. सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्सने ०.१२ टक्क्यांनी वाढून १७,८८६ वर व्यवहार केला. (Share Market Today)
गेल्या शुक्रवारी सेन्सेक्स ९८१ अंकांनी घसरून ५९,८४५ वर, तर निफ्टी १७,८०६ वर बंद झाला होता.
हे ही वाचा :
- Paytm Shares Buyback : पेटीएम करणार शेअर्सची पुनर्खरेदी; एका शेअर्ससाठी ८१०रुपये
- Mutual funds : म्युच्युअल फंडावर कर्ज घेताय? जाणून घ्या अधिक