Stock Market Updates | जागतिक संकेत सकारात्मक, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत | पुढारी

Stock Market Updates | जागतिक संकेत सकारात्मक, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

Stock Market Updates : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नोव्हेंबरच्या पतधोरण बैठकीत व्याजदर वाढीवर नियंत्रण राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी (दि.२४) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८० अंकांनी वधारून ६१,८०० वर गेला. तर निफ्टी ८२ अंकांनी वाढून १८,३०० वर पोहोचला. बीएसईवर १,७२६ शेअर्स वाढताना दिसत होते तर ६४३ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, यूपीएल, एचडीएफसी लाईफ, बीपीसीएल आणि एम अँड एम यांचे शेअर्स आज एनएसई प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक २.६३ टक्क्यांपर्यंत वाढले.

अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी आल्यामुळे आशियाई शेअर्सही वधारले आहेत. जपानचा निक्केई निर्देशांक १.१७ टक्क्यांनी वाढला. दक्षिण कोरियाचा KOSPI ०.५५ टक्क्यांनी आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.००२ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.४३ टक्क्यांनी वधारला आहे.

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ७९० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ४१४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button