प्रसाद पाटील : पॉवर ऑफ अॅटर्नी हे एक कायदेशीर कागदपत्र असून, त्या माध्यमातून एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचा सांभाळ किंवा हाताळण्यासाठी नियुक्त करत असतो. पॉवर ऑफ अॅटर्नीअंतर्गत नेमण्यात येणार्या व्यक्तीला प्रिन्सिपल, डेनर किंवा ग्रँटर असे म्हटले जाते.
शाहरूख खानचा बाजीगर चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. पॉवर ऑफ अॅटर्नीचा होणारा दुरपयोग यात दाखविला आहे. अर्थात तत्कालीन काळात अनेकांना हा शब्द माहीतदेखील नव्हता. परंतु या चित्रपटामुळे त्याची ढोबळ कल्पना सर्वांना आली. कालांतराने अन्य चित्रपटांतून, चर्चेतून, माध्यमातून वेळोवेळी पॉवर ऑफ अॅटर्नीबाबत बोलले गेले आणि सांगितले गेले आहे.
पॉवर ऑफ अॅटर्नी हे एक कायदेशीर कागदपत्र असून, त्या माध्यमातून एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचा सांभाळ किंवा हाताळण्यासाठी नियुक्त करत असतो. पॉवर ऑफ अॅटर्नीअंतर्गत नेमण्यात येणार्या व्यक्तीला प्रिन्सिपल, डेनर किंवा ग्रँटर असे म्हटले जाते. अधिकृत व्यक्तीला एजंट किंवा पॉवर ऑफ अॅटर्नी एजंट असेही म्हटले जाते. नियम आणि अटींच्या आधारावर अधिकृत एजंटकडे मालमत्तेशी निगडित कायदेशीर निर्णय घेण्याचे अधिकार असतात.
निश्चित आणि सोपविलेल्या जबाबदारीच्या आधारावर चार प्रकारचे पॉवर ऑफ अॅटर्नी असू शकतात.
जबाबदारीचे आकलन केल्यास इंस्ट्रुमेंटला जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी (जीपीए) असेही म्हटले जाते. या सुविधेअंतर्गत व्यक्ती एखादी निश्चित जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्त केली जाते. तसेच त्याची नियुक्ती ठराविक काळासाठी लागू होते.
ड्यूरेबल पॉवर ऑफ अॅटर्नी हा लाईफटाईम असतो. ग्रँटर अनफिट असतो तेव्हा एजंटला या नियमांतर्गत निर्णय घेण्याचे अधिकार असतात. ग्रँटरचा मृत्यू जोपर्यंत होत नाही किंवा त्याच्याकडून जोपर्यंत योजना बदलली जात नाही तोपर्यंत पॉवर ऑफ अॅटर्नी कायम राहते. जसे ग्रँटर हा गुंतवणूक पोर्टफोलिओला मॅनेज करण्यासाठी एजंट नेमू शकतो.
कोणताही खास इव्हेंट, डेट किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी स्प्रिंगिंग पॉवर ऑफ अॅटर्नीचा उपयोग केला जातो. विशेेषत: जेव्हा ग्रँटर निर्णय घेण्यास असमर्थ असतो तेव्हा या प्रकारातील पॉवर ऑफ अॅटर्नीचा वापर होतो. उदा. निवृत्त लष्करी अधिकार्यास अपंगत्व आल्यास तो एक पॉवर ऑफ अॅटर्नी नेमू शकतो.
मेडिकल पॉवर ऑफ अॅटर्नी ही स्प्रिंगिंग आणि ड्यूरेबल पॉवर ऑफ अॅटर्नीअंतर्गत येते. या सुविधेचा वापर आरोग्याशी निगडित प्रकरणात केला जातो. मात्र नियुक्त करणार्या व्यक्तीचे आरोग्य संतुलित असणे गरजेचे आहे.
पॉवर ऑफ अॅटर्नीची निवड करणे जरा कठीण जाऊ शकते. त्याच्या पात्रतेचा विचार केल्यास जबाबदार, विश्वासू, 18 पेक्षा अधिक वयाचा आणि निर्णय घेण्याची क्षमता असणार्या व्यक्तीची नियुक्ती करता येऊ शकते.