आरोग्य विमा : ओपीडी कव्हर कोणी घ्यावे?

आरोग्य विमा : ओपीडी कव्हर कोणी घ्यावे?
Published on
Updated on

बदलत्या काळानुसार हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या आता आऊट पेशंटच्या खर्चाला कवच देत आहेत. यानुसार सर्व रुग्णालयांच्या ओपीडीचा खर्च सामील करण्यात आलेला आहे. कोरोनानंतर जगभरात हेल्थ इन्श्युरन्सबाबत नागरिक सजग झाले आहेत. कोणत्याही प्रकारच्या आरोग्य आणीबाणीसाठी हेल्थ इन्श्युरन्स उपयुक्‍त ठरत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कॉम्प्रेन्सिव्ह इन्श्युरन्सबाबत वाढती जनजागृती आणि मागणीमुळे आरोग्य विमा कवचची व्याप्‍ती वाढलेली आहे. आता बदलत्या काळानुसार आरोग्य विमा कंपन्या आऊट पेशंट कव्हरेजदेखील देत आहेत. यात ओपीडीचा खर्चदेखील कव्हर होतो. तज्ज्ञांच्या मते, आजच्या काळात सर्वांनी ओपीडी कव्हरेजबरोबर हेल्थ इन्श्युरन्स घेणे गरजेचे आहे. आपले रुटीन हेल्थ चेकअपदेखील हेल्थ पॉलिसीत कव्हर होते.

इन्श्युरन्स कंपन्या आता ओपीडीच्या उपचारासाठी देखील प्लॅन ऑफर करत आहेत. यानुसार कोणीही वेगवेगळ्या कोणत्याही प्लॅनपैकी ओपीडी कवच देणार्‍या प्लॅनची निवड करता येऊ शकते. हे प्लॅन ओपीडीच्या एकवेळच्या खर्चापेक्षा कमी खर्चात मंथली ओपीडी कव्हर देतात. त्याचबरोबर रुग्णालयाच्या भेट दिल्यानंतर त्याच दिवशी पेमेंट काढण्यासही अडचण येत नाही. ओव्हर द काऊंटर मेडिसिनऐवजी अचूक आणि योग्य उपचारासाठी हे प्लॅन मदत करतात. 'इर्डा'च्या मते, भारतात सर्वच मेडिकल बिल्सपैकी सुमारे 62 टक्के भरणा हा प्रामुख्याने खिशातूनच होतो. यातील बहुतांश रुग्णांचा खर्च हा ओपीडीवरच होतो. म्हणून या खर्चाला हेल्थ इन्श्युरन्समध्ये आणण्यासाठी विचार केला गेला.

ओपीडी खर्च म्हणजे काय?

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या ओपीडी कव्हरमध्ये विमाधारक हा रुग्णालयात दाखल होण्याशिवाय अन्य खर्चासाठी दावा करू शकतोे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने अन्य क्लिनिक आणि उपचारासंबंधी करण्यात आलेल्या खर्चाचादेखील यात समावेश असतो. यासाठी एखाद्या व्यक्‍तीला रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. विमाधारक व्यक्‍ती हा ओपीडी विमा कवचच्या मदतीने ओपीडी ते रुग्णालयात अ‍ॅडमिट होणे यादरम्यान झालेल्या अन्य खर्चासाठीही दावा करू शकतो. याशिवाय या योजना स्टँडर्ड हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या तुलनेत अधिक टॅक्स बेनिफिट देतात.

ओपीडी कव्हर कोणी घ्यावे?

काही जण ओपीडीतील उपचारातूनच बरे होतात. ओपीडी कव्हर हे हेल्थ इन्श्युरन्सचा अधिकाधिक लाभ उचलण्यासाठी मदत करते. यात व्हायरल ताप यासारख्या किरकोळ आजाराबरोबरच मधुमेह, पाठदुखी यांसारख्या जुन्या विकारांपोटी झालेल्या औषधोपचाराच्या खर्चाचा समावेश आहे. मात्र केवळ नेटवर्क क्लिनिक आणि रुग्णालयातील ओपीडीचा खर्च मिळू शकतो.

वर्षाच्या आत अधिकाधिक मर्यादेत ओपीडीपोटी केलेल्या अनेक खर्चासाठी दावा करता येतो. ओपीडी कवच हा दोन प्रकारे मिळू शकते. क्लोज्ड नेटवर्क आणि ओपन नेटवर्क ओपीडी पॉलिसी. ओपन नेटवर्क इन्श्युरन्समध्ये कस्टमर कोणत्याही ओपीडीत जाऊ शकतो आणि फीस पेमेंट करण्याचा दावा करू शकतो. क्लोज्ड नेटवर्क ओपीडी कवच सुविधा ही तुलनेने उपयुक्‍त ठरते. कारण यात सर्वप्रकारचे लाभ कमी किमतीत उपलब्ध होतात.

-जान्हवी शिरोडकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news