बचत : फॉर्म 15 जी आणि 15 एच म्हणजे काय? | पुढारी

बचत : फॉर्म 15 जी आणि 15 एच म्हणजे काय?

‘15 जी’ आणि ‘15 एच’ फॉर्म भरून संबंधित व्यक्ती हा आपण प्राप्तिकर कक्षेत येतो की नाही, हे सांगत असतो. या आधारे टीडीएस कपात वाचवता येणे शक्य आहे. भारतातील एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात दहा हजारांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर बँकेकडून टीडीएस कपात केली जाते. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न करमर्यादापेक्षा कमी असेल, तर तो ‘15 जी आणि ‘15 एच’ फॉर्म भरून टीडीएस कपात न करण्याची विनंती करू शकतो. ‘15 जी’ आणि ‘15 एच’ फॉर्ममध्ये किरकोळ फरक आहे. 15 एच फॉर्म हा 60 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना भरावा लागतो, तर फॉर्म 15 जी हा अन्य लोक भरू शकतात.

फॉर्म 15 एचमध्ये काय?

  •  फॉर्म 15 एच हा प्राप्तिकर कायद्याच्या कलम 1961 च्या कलम 197 अ च्या उपकलम 1 (सी)च्या अंतर्गत येणारा डिक्लेरेशन फॉर्म आहे.
  •  हा अर्ज 60 पेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील लोक भरू शकतात.
  •  गेल्या वर्षीचा इस्टिमेट टॅक्स हा शून्य असणे गरजेचे आहे. गतवर्षी कर भरलेला नसावा कारण त्याचे उत्पन्न हे कर मर्यादेपेक्षा कमी असायला हवे.
  •  ज्या बँकेतून व्याज मिळत आहे, त्या बँकेत हा अर्ज भरायला हवा.
  •  व्याज जमा होण्यापूर्वीच हा अर्ज द्यायला हवा. अर्थात ही बाब बंधनकारक नाही; परंतु हा अर्ज वेळेत दिल्यास बँकेकडून टीडीएस कापला जाणार नाही.
  • याशिवाय अन्य स्रोतांतून व्याज मिळत असेल; जसे की कर्ज, अ‍ॅडव्हान्स, डिबेंचर, बाँड्स यावर व्याजाचे उत्पन्न हे 5 हजारांपेक्षा अधिक मिळत असेल; तर फॉर्म 15 एच अर्ज भरावा लागेल.

फॉर्म 15 जी म्हणजे काय?

  • फॉर्म 15 जी हा प्राप्तिकर कायदा कलम 1961 याअंतर्गत सेक्शन 197 एच्याअंतर्गत उपकलम 1 आणि 1 (ए) च्या आत येणारा
  • डिक्लेेरेशन फॉर्म आहे. हा अर्ज भरण्यासाठी काही निकष आहेत.
  • हिंदू अविभाजित कुटुंब, 60 पेक्षा कमी वयोगटातील कोणताही व्यक्ती अर्ज भरू शकतो.
  • मुदत ठेवीवर व्याज जमा होण्यापूर्वी 15 जी अर्ज जमा करावा लागेल.
  •  ज्या ज्या बँकेतून व्याज मिळते, त्या त्या बँकेत हा अर्ज भरावा लागेल.
  •  ज्यांचे उत्पन्न करकक्षेत येत नाही, त्यांनाच हा फॉर्म भरता येतो.
  •  अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • आर्थिक वर्षाच्या काळात व्याजापासून मिळणारे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.अमित शुक्ल

Back to top button