यूपीआय आणि डिजिटल वॉलेट मध्ये फरक काय? - पुढारी

यूपीआय आणि डिजिटल वॉलेट मध्ये फरक काय?

यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ट्रांझेक्शन हा थेट दोन बँकांमधील व्यवहार असतो. याउलट डिजिटल वॉलेट हे बँक खात्यातील मध्यस्थांची भूमिका बजावण्याचे काम करते.

ऑनलाईन पेमेंट करण्याचे आणि पैसा ट्रान्स्फर करण्याचे अनेक मार्ग आहेत. यात यूपीआय आणि डिजिटल वॉलेटचा यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल. अर्थात, अनेक मंडळींना या दोन्हीतील फरक ठाऊक नाही. यूनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयनुसार दोन बँकेतील तातडीने पैसे ट्रान्स्फर केले जातात. तर त्याचवेळी पेटीएम, फोन पे यासारखे डिजिटल वॉलेट हे डिजिटल व्यवहार करण्यापूर्वी पैसे भरावे लागतात.

यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ट्रांझेक्शन हे थेट बँकेतून बँकेत होते. याउलट डिजिटल वॉलेट हे दोन खात्यांतील मध्यस्थांची भूमिका म्हणून काम करते. हे वॉलेट एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे ट्रान्स्फर करताना पूल म्हणून काम करते.
यूपीआयमधील व्यवहारात व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस आणि आयडेंटीचा वापर केला जातो. त्याचवेळी डिजिटल वॉलेटमध्ये मोबाईल क्रमांकाचा वापर होतो.

यूपीआयमधील व्यवहाराची मर्यादा ही एक लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्याचवेळी वॉलेटच्या व्यवहाराचा विचार करताना ग्राहकाचे केवायसी झालेले नसेल, तर महिनाभरात केवळ दहा हजारांचा व्यवहार करता येतो.

यूपीआय व्यवहार दोन बँकांत होऊ शकतो. याउलट डिजिटल वॉलेट ट्रांझेक्शन हे त्याच डिजिटल वॉलेट अ‍ॅपच्या दोन खात्यात होऊ शकतो. याचाच अर्थ असा की, पैसे ट्रान्स्फर करणारा आणि स्वीकारणारा या दोघांकडेही वॉलेट अ‍ॅप असणे गरजेचे आहे.

यूपीआय फ्युचर ट्रांझेक्शनची सवलत देते, तर डिजिटल वॉलेटमध्ये अशा प्रकारची सुविधा नसते. त्याचा उपयोग प्रामुख्याने तत्काळ व्यवहारासाठी होतो. म्हणजेच आपण तातडीने लगेच पैसे ट्रान्स्फर करू शकता.

Back to top button