आजारपणाचे संकेत

आजारपणाचे संकेत
Published on
Updated on

डॉ. महेश बरामदे

आळस, उत्साहाचा अभाव या कारणांमुळे काम करण्यात लक्ष लागत नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतरही ताजेतवाने वाटत नसेल आणि दररोज तसाच अनुभव येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

सतत थकवा, ताण, चिंता : अनेक दिवसांपासून आपल्याला वारंवार थकवा जाणवत असेल आणि भरपूर मेहनत न करताही थकवा येत असेल, तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या गेाष्टी अनेक प्रकारच्या शारीरिक आजारपणाचे संकेत असू शकतात. स्ट्रेस एंग्झायटीने ग्रस्त झाल्यावरही थकवा जाणवतो. थकव्याची अनेक लक्षणे दिसू लागतात. जसे की, डोकेदुखी, ताप, वजन अधिक होणे, शरीरात रक्‍त कमी होणे, चक्‍कर येणे आदी. मधुमेह असल्यावरही थकवा जाणतो. आपल्याला हेल्दी, फिट आणि एनर्जेटिक राहायचे असेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सतत अस्वस्थ वाटणे : आपल्याला सतत अस्वस्थ वाटत असेल, मळमळ होत असेल, तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. विवाहित महिला जेव्हा मळमळ, उलटी होत असल्याची तक्रार करतात तेव्हा गर्भधारणा, पाळी, मोनोपॉज संबंधित समस्या हे कारण असू शकते. अनेकदा पित्त झाल्यानेही उलटी येते. आपण आरोग्यदायी असाल, तर वारंवार मळमळ होणार नाही. परंतु, अशा प्रकारचा त्रास दोन-तीन दिवसाला होत असेल, तर त्याचे वेळीच निदान करणे गरजेचे आहे. अन्यथा आजाराचे गांभीर्य वाढत जाईल. अस्वस्थ, मळमळ वाटण्याच्या लक्षणात डोकेदुखी, ताप, अतिसार, पोटदुखी, चक्कर, फिरल्यासारखे वाटणे आदींचा समावेश आहे. उलटी येण्याचे आणखी काही कारणे असू शकतात. बाऊल ऑब्सट्रक्शन, केमोथेरेपी, मॉर्निंग सिकनेस, रेडिएशन थेरेपी, मेडिकेशन, प्रेग्‍नसी, मेंदू, गॉलब्लॅडर, एसोफेगस, लिव्हर, पॅनक्रियाच, पोट आणि आतड्याचे विकार आदी.

डोकेदुखीने त्रस्त : आजकालच्या जीवनशैलीने डोकेदुखीची समस्या वाढली आहे. परंतु, सतत डोके दुखणे हे मायग्रेन किंवा अन्य समस्येचे संकेतही असू शकतात. अनेकदा तणाव, ताण, चिंता, संगणकासमोर बराच काळ बसून काम करणे, सायनस, डोक्याला मार लागणे आदी कारणांमुळे देखील डोकेदुखी राहू शकते. आपले डोके सतत दुखत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अर्थात, काही मिनिटांत डोकेदुखी कमी होते; परंतु दोन-तीन दिवसांनंतरही डोकेदुखी होत असेल, तर केवळ गोळ्या खाऊ नये. काही वेळा मेंदूसंबंधित समस्येमुळेदेखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकते. त्यामुळे सजग राहणे गरजेचे आहे. कोणत्याही लक्षणांपासून आपण सावध राहिले पाहिजे. बिघडलेल्या तब्येतीचे संकेत शरीर देत असते. याकडे लक्ष द्यायला हवे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news