Heart Attack In Women | तरुण महिलांमध्ये 50% हृदयविकाराचे झटके ब्लॉकेजमुळे नाहीत; जाणून घ्या खरं कारण काय?

Heart Attack In Women | कोरोना काळानंतर तरुणांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
take-care-of-your-heart-during-menopause
Menopause| रजोनिवृत्तीदरम्यान घ्या हृदयाची काळजी Pudhari File Photo
Published on
Updated on

Heart Attack In Women

कोरोना काळानंतर तरुणांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अनेकजण अजूनही हृदयविकार म्हणजे फक्त धमन्यांमधील ब्लॉकेज, वाढलेले कोलेस्टेरॉल किंवा चरबीचे थर असेच समजतात. पण मेयो क्लिनिकने केलेल्या १५ वर्षांच्या मोठ्या अभ्यासातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

take-care-of-your-heart-during-menopause
अर्थवार्ता : देशातील किरकोळ महागाई दर 2.07 टक्क्यांवर

या संशोधनानुसार, ६५ वर्षांखालील महिलांमध्ये होणाऱ्या ५०% पेक्षा जास्त हृदयविकाराच्या झटक्यांचे कारण धमन्यांमधील अडथळे नसतात. तर ते SCAD (स्पॉन्टेनियस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन), एम्बोलिझम, संसर्ग किंवा शरीरातील अशक्तपणा यांमुळे होतात.

SCAD म्हणजे काय?

SCAD म्हणजे हृदयाच्या धमन्यांच्या आतील भिंतीत अचानक फट पडणे किंवा ती फुटणे. त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो, हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि झटका येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे SCAD प्रामुख्याने अशा महिलांमध्ये आढळतो ज्या दिसायला निरोगी असतात आणि ज्यांच्याकडे इतर हृदयरोगाचे जोखीम घटक नसतात.

चुकीचे निदान मोठी समस्या

या अभ्यासातून असेही समोर आले आहे की महिलांना हृदयविकाराचा झटका आला तरी त्याचे योग्य निदान अनेकदा केले जात नाही. SCAD चा झटका आला तरी तो पारंपारिक ब्लॉकेजमुळे झालेला हृदयविकार समजला जातो आणि त्यावर चुकीचा उपचार केला जातो. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

हार्मोन्स आणि प्रसूतीनंतरचा धोका

संशोधनात असेही आढळले आहे की हार्मोनल बदल, प्रसूतीनंतरचे ताणतणाव आणि अनुवांशिक वैशिष्ट्ये महिलांमध्ये SCAD चा धोका वाढवू शकतात. एम्बोलिझममध्ये रक्तात गाठ तयार होऊन ती हृदयाच्या धमन्या ब्लॉक करते. संसर्ग आणि अशक्तपणामुळेही हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि झटका येण्याची शक्यता वाढते.

take-care-of-your-heart-during-menopause
ITR Filing 2025 | करदात्यांनो सावधान! 16 सप्टेंबरला देखभालीसाठी वेबसाइट राहणार ठप्प

पारंपारिक समजुतींपलीकडे जाऊन उपचारांची गरज

वैद्यकीय क्षेत्रात आजही हृदयविकार म्हणजे ब्लॉकेज हीच सर्वसामान्य समजूत आहे. पण हा अभ्यास दाखवतो की विशेषतः तरुण महिलांमध्ये हे कारण कमी प्रमाणात असते. जर डॉक्टर फक्त ब्लॉकेज शोधण्यात गुंतले तर SCAD किंवा इतर कारणांकडे दुर्लक्ष होते आणि योग्य उपचार होत नाहीत.

हा अहवाल सुचवतो की हृदयविकाराचा उपचार त्याच्या मूळ कारणांवर आधारित असावा. उदाहरणार्थ, SCAD असलेल्या रुग्णांना लगेच स्टेंट बसवण्याऐवजी औषधोपचार, विश्रांती आणि नियमित देखरेख यावर भर द्यावा.

मृत्यूदर वाढीचा इशारा

अभ्यासातून असेही स्पष्ट झाले आहे की अशा नॉन-प्लेक हृदयविकारांमुळे पुढील पाच वर्षांत मृत्यूदर जास्त असतो. त्यामुळे महिलांनी हृदयाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित तपासणी करून घ्यावी, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news