Diabetes and BP: वयाच्या ४० नंतर उच्च रक्तदाब आणि मधुमेह एकाच वेळी का होतात? जाणून घ्या मुख्य कारणे

नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार, ४० वर्षांनंतर मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही आजारांचा धोका एकत्रितपणे वाढतो.
Diabetes and BP
Diabetes and BPFile Photo
Published on
Updated on

high blood pressure and diabetes

नवी दिल्ली: नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार, ४० वर्षांनंतर मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही आजारांचा धोका एकत्रितपणे वाढतो. 'डायबिटीज अँड मेटाबॉलिक सिंड्रोम: क्लिनिकल रिसर्च अँड रिव्ह्यूज' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या मॅक्स हेल्थकेअरच्या या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली असून, तज्ज्ञांनी वाढत्या वयानुसार या दोन्ही आजारांची वेळीच तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.

मॅक्स हेल्थकेअरच्या क्लिनिकल रिसर्च आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ प्रोग्राम विभागाने हा अभ्यास केला आहे. यामध्ये दिल्ली-एनसीआरमधील सहा मॅक्स हॉस्पिटल्समधील ५६ हजारांहून अधिक प्रौढांच्या आरोग्य नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. हे रुग्ण जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२४ दरम्यान प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी आले होते.

Diabetes and BP
Analog Paneer Test: ॲनालॉग पनीर आणि अस्सल पनीर ओळखायचं कसं? ही सोपी ट्रिक लक्षात ठेवा

वयानुसार धोका वाढतो?

अभ्यासात असे आढळले की, जवळपास ५ टक्के प्रौढांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार एकाच वेळी आहेत. हे प्रमाण अपेक्षेपेक्षा दुप्पट आहे. संशोधनानुसार, वयाच्या ४० व्या वर्षापासून या दुहेरी आजारांचा धोका वेगाने वाढू लागतो. ५८ वर्षांपर्यंत यात सातत्याने वाढ होत राहते आणि ७० व्या वर्षापर्यंत हे प्रमाण १७ टक्क्यांवर स्थिरावते.

दोन्ही आजारांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध

संशोधकांनी या दोन विकारांमधील संबंध स्पष्ट केला आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांना उच्च रक्तदाब असण्याची शक्यता सामान्य व्यक्तीच्या तुलनेत चार पटीने अधिक असते. तसेच, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता अडीच पटीने जास्त असते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची गरज

मॅक्स हेल्थकेअरचे बायोस्टॅटिस्टिक्स सल्लागार डॉ. अभय इंद्रायण यांनी सांगितले की, "भारतात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि त्यात मधुमेह व उच्च रक्तदाब हे प्रमुख आहेत. आता केवळ एका आजाराच्या तपासणीवर अवलंबून न राहता एकात्मिक प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची गरज आहे."

केवळ एक आजार लक्षात घेऊन उपचार करण्यापेक्षा दोन्ही आजारांची एकत्रित चाचणी करणे गरजेच आहे. यामुळे हृदयविकार, पक्षाघात आणि मूत्रपिंडाचे आजार यांसारख्या गंभीर गुंतागुंती टाळता येऊ शकतात, असा महत्त्वाचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Diabetes and BP
Health News: दीर्घायुष्याचा उपाय सापडला! जपानी अभ्यासातून मोठा खुलासा; तुमचीही वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news