High Hemoglobin | हिमोग्लोबिन अति वाढल्यास...

High Hemoglobin |
High Hemoglobin | हिमोग्लोबिन अति वाढल्यास...
Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असणे गरजेचे आहे. जर कोणाच्या शरीरात हिमोग्लोबिनची लेव्हल प्रमाणापेक्षा अधिक वाढली तर त्याला विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

हिमोग्लोबिन कमी असल्यास शरीरात मोठ्या प्रमाणावर रक्ताची कमतरता जाणवते आणि त्यामुळे अ‍ॅनिमियाचे बळीदेखील जातात. भारतात अ‍ॅनिमियाची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसते. विशेषतः महिलांमध्ये आणि मुलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याच्या तक्रारी सर्वदूर दिसतात, पण अनेकांना ही गोष्ट माहीत नसते की, रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी जास्त झाली तरीही त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतो. काय होतात दुष्परिणाम?

हिमोग्लोबिन हे रक्तात असणार्‍या लाल रक्त पेशींमध्ये असणारे एक प्रोटिन आहे. हिमोग्लोबिनच्या मदतीने ऑक्सिजन शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबिनची लेव्हल ही वेगवेगळी असते. जर कोणाच्या शरीरात हिमोग्लोबिनची लेव्हल प्रमाणापेक्षा अधिक वाढली तर त्याला विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

हिमोग्लोबिनचे प्रमाण 14 ते 15 प्रति डेसीलिटर असते. हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण पुरुषांमध्ये 15 ते 16 प्रति डेसीलिटर आणि महिलांमध्ये 14 ते 15 हिमोग्लोबिन असावे. याच्यापेक्षा कमी हिमोग्लोबिन अथवा या लेव्हलपेक्षा जास्त हिमोग्लोबिन हे शरीराला अपायकारक ठरते.

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्यामुळे तुमचा मेंदू नीट काम करत नाही. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते. तुमचा गोंधळ उडू लागतो आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट उशिरा समजते. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्यास ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे पॉलिकॅथेमिया नावाचा आजार होतो. यामुळे अस्थिमज्जा लाल रक्तपेशींचे असामान्य उच्च स्तर तयार करण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय या पेशी रक्त घट्ट करतात. त्यामुळे रक्तप्रवाहास विलंब होतो. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

शरीरात हिमोग्लोबिन वाढले की नाकातून आणि आतड्यांमधून रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. हिरड्यांमधून रक्तस्राव होण्याची समस्या कायम राहते. हिमोग्लोबिन वाढल्यामुळे तुम्हाला वारंवार थकवा जाणवू शकतो, या स्थितीत कोणतेही काम करताना लवकर थकवा येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news